Koffee With Karan 8: करण जोहरनं केली 'कॉफी विथ करण-8' ची घोषणा; शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Koffee With Karan 8: करण जोहरने कॉफी विथ करणच्या आठव्या सीझनची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून करणनं याबाबत माहिती दिली आहे.
Koffee With Karan 8: दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) कॉफी विथ करण (Koffee With Karan 8) या चॅट शोचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. करण जोहरने कॉफी विथ करणच्या आठव्या सीझनची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून करणनं याबाबत माहिती दिली आहे. करणने कॉफी विथ करणच्या आठव्या सीझनची घोषणा एका खास पद्धतीने केली आहे. त्याने नुकताच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रेक्षकांना कोणत्या प्लॅटफॉर्मवर हा शो पाहता येणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...
करण जोहरनं सोशल मीडियावर शेअर कलेल्या व्हिडीओमध्ये तो स्वत:लाच ट्रोल करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये करण हा प्रेक्षकांना डबल रोलमध्ये दिसत आहेत. हे दोन करण कॉफी विथ करणच्या गेल्या सीझनबाबत चर्चा करताना दिसत आहेत. त्यापैकी एक करण हा कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या आठव्या सीझनची घोषणा करतो.
करणनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'असे झाले की, माझ्या स्वतःच्या Konscience (विवेक) ला मला ट्रोल करायचे आहे! पण त्याला काय वाटते त्याच्याकडे लक्ष देऊ नका, मी सीझन 8 साठी तयार करत आहे!'
कॉफी विथ करण सीझन 8 कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीस?
कॉफी विथ करण सीझन 8 हा चॅट शो डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 26 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या इतर सीझन प्रमाणेच यंदाही बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या सात सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या कार्यक्रमामध्ये विविध सेलिब्रिटी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा करतात. तसेच कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये सेलिब्रिटी कशी उत्तरं देतात याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते.
View this post on Instagram
कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता या कार्यक्रमाच्या आठव्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी येणार? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: