Hemant Dhome And Kshitee Jog: पहिली भेट आणि घरच्या घरीच साखरपुडा; क्षिती आणि हेमंत यांची हटके लव्हस्टोरी
हेमंत आणि क्षिती यांच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेऊयात...
Hemant Dhome And Kshitee Jog: अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि अभिनेत्री क्षिती जोग (Kshitee Jog) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. हेमंत आणि क्षिती यांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. मराठी चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध जोडीच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेऊयात...
क्षिती आणि हेमंत यांची पहिली भेट
एका मुलाखतीमध्ये क्षिती आणि हेमंत यांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं. याबद्दल हेमंतनं सांगितलं, 'सावधान शुभमंगल या नाटाकाच्या रिहर्सलला भेटलो. त्याआधी मी तिला ओळख होतो ती माझ्या एका नाटकाला देखील आली होते. पण सावधान शुभमंगल या नाटाकाच्या रिहर्सलच्या वेळी आमची ओळख झाली आणि नंतर आमच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.'
घरी सांगितल्यावर कशी रिअॅक्शन होती?
तुमच्या नात्याबाबात जेव्हा तुम्ही घरी सांगितलं तेव्हा घरच्यांची कशी रिअॅक्शन होती? असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये विचारल्यानंतर क्षिती म्हणाली, 'जेव्हा मी माझ्या घरी सांगायचं ठरवलं तेव्हा, तो माझ्या घरी आला होता. तेव्हा माझी आई त्याला म्हणाली होती, तू तोच ना ज्याचं कोणाशी तरी अफेअर चालू होतं. त्यानंतर हेमंत म्हणाला, 'मी त्यांना सांगितलं की, असं काही नाहीये ती अफवा होती.'
हेमंतनं पुढे सांगितलं, 'माझ्या घरच्यांनी थोडी वेगळी रिअॅक्शन दिली होती. याच फिल्डमधली मुलगी आहे, तुझ्यापेक्षा थोडी मोठी आहे, या गोष्टींबद्दल घरच्यांनी मला विचारलं. क्षिती आणि माझ्यात तीन वर्षांचं अंतर आहे, ती माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. तिला जेव्हा माझे घरचे भेटले तेव्हा माझ्या घरच्यांनी होकार दिली.'
हेमंत पुढे म्हणाला, 'घरच्या घरीच आमचा साखरपुडा झाला. साखरपुड्याला तिच्या घरचे आणि माझ्या घरचे एवढेच जणं होतं. लग्नाला देखील आम्ही फक्त जवळचे नातेवाई आणि मित्र मैत्रीणींनाच आम्ही बोलवलं होतं.'
'जेव्हा लग्नानंतर आम्ही एकत्र राहायला लागलो तेव्हा आमची खरी लव्ह स्टोरी चालू झाली' असंही हेमंतनं सांगितलं.
View this post on Instagram
क्षितीचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर हेमंतनं दिग्दर्शित केलेल्या झिम्मा-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Hemant Dhome : 'माझ्या एका चुकीने माझाच गेम झाला'; पत्नी क्षितीसमोर हेमंतनं सांगितली आठवण