(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Khan : 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली; भाईजानकडून खास पोस्ट शेअर
Salman Khan : सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमासंबंधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाची रिलीज डेट आता बदलण्यात आली आहे.
Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) पुढल्या वर्षी अनेक धमाकेदार सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बहुचर्चित 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमापासून भाईजान बॉक्स ऑफिसवर धमाका करायला सुरुवात करणार आहे. अशातच या सिनेमासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाची रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली आहे. ईदच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर भाईजानचा दबदबा पाहायला मिळत असतो. त्यामुळे 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमादेखील पुढील वर्षात ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दबंग खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या नव्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. या सिनेमाचं पोस्टर शेअर करत भाईजानने लिहिलं आहे,"दिवाळीच्या मुहूर्तावर 'टायगर 3' (Tiger 3) आणि ईद 2023 मध्ये 'किसी का भाई किसी की जान'. दिवाळी आणि ईद दोन्ही सण सिनेमांसह साजरे करा. त्यानंतर नाताळच्या मुहुर्तावर सर्कस प्रेक्षकांच्या येत आहे.
View this post on Instagram
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी सांभाळत आहे. या सिनेमात सुपरस्टार रणवीर सिंहदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टर शेअर करत सलमानने आता 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. हा सिनेमा 21 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'टायगर 3'ची रिलीज डेट जाहीर
सलमान खानच्या आगामी 'टायगर 3' या सिनेमाचीदेखील नवी रिलीज डेट समोर आली आहे. हा सिनेमा पुढील वर्षात दिवळीच्या मुहूर्वावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 12 नोव्हेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमानसह अभिनेत्री कतरिना कैफदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्यासोबतच अभिनेत्री शहनाज गिलदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर पलक तिवारी, व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या