Shah Rukh Khan: 'अख्ख्या देशानं घरात बसल्या-बसल्या शिट्ट्या वाजवल्यात भावा!' किरण मानेंकडून शाहरुखचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले, 'नानावटी हॉस्पिटलमध्ये...'
किरण माने (Kiran Mane) यांनी या पोस्टच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) कौतुक केले आहे.
![Shah Rukh Khan: 'अख्ख्या देशानं घरात बसल्या-बसल्या शिट्ट्या वाजवल्यात भावा!' किरण मानेंकडून शाहरुखचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले, 'नानावटी हॉस्पिटलमध्ये...' Kiran Mane share post about Shah Rukh Khan and jawan movie Shah Rukh Khan: 'अख्ख्या देशानं घरात बसल्या-बसल्या शिट्ट्या वाजवल्यात भावा!' किरण मानेंकडून शाहरुखचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले, 'नानावटी हॉस्पिटलमध्ये...'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/9315aba2078a827f880ebf049a1145221693812527833259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shah Rukh Khan: अभिनेता किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकतीच किरण माने यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) कौतुक केले आहे.
किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर !"अग्ग्गाय्यायायाया... अख्ख्या देशानं घरात बसल्या-बसल्या शिट्ट्या वाजवल्यात भावा! पिच्चर आल्यावर काय होईल? तू आहेसच भन्नाट,जबराट,नादखुळा.तुझ्यावर जळणाऱ्यांनी लै अफवा पसरवल्या दोस्ता, पण तू मागं हटला नाहीस. ट्रोलर्सच्या झुंडीनं तुला लै ट्रोल केला, लै हेटाळनी केली, पण तू भिडलास, नडलास, जिंकलास. तुझ्या पोराला अडकवून तुला झुकवन्याचा प्रयत्न झाला, पण तू तर 'बाजीगर' ! गप र्हावून बाजी पलटलीस. परत ताठ कण्यानं, उंच मानेनं उभा राहिलास. भक्कम. पाय रोवून. तुझी ती 'कातिल' नजर रोखून.
पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'आजबी तुझ्या 'मन्नत'पुढं रोज अख्ख्या भारतातनं तरूण पोरंपोरी येऊन उभी राहतात... तासनतास तुझ्या घराकडं बघत बसत्यात... त्यांना तुझ्या जातीधर्माशी घेणंदेणं नसतं. कारन ते तुझ्यासारखेच 'अस्सल' भारतीय असत्यात. तुझी एक झलक दिसली तर आनंदानं नाचायला लागत्यात...येडी होत्यात. जगातला सगळ्यात लोकप्रिय कलाकार हायेस तू. तू फक्त अभिनयातला बादशाह नाहीस, तर 'मानूस' म्हणूनबी तू 'किंग' हायेस ! ॲसिड अटॅक झालेल्या हजारो महिलांची आयुष्य उभी करून दिलीयस तू. नानावटी हाॅस्पिटलमध्ये लहान मुलांच्या कॅन्सरसाठी तू जो वाॅर्ड उभा केलायस त्यानं कित्येक चिमुरड्यांचे जीव वाचवलेत.'
किरण माने यांनी या पोस्टमध्ये पठाण या चित्रपटाचं देखील कौतुक केलं आहे.
शाहरुखचा 'जवान'हा बहुप्रतिक्षित चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.शाहरुख खानच्या जवान चित्रपटानंतर त्याचा डंकी हा चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी शाहरुखचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)