Katrina Kaif & Vicky Kaushal wedding : कतरिना आणि विकीच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी 'या' अटी, ऐकून व्हाल थक्क!
Katrina Kaif & Vicky Kaushal wedding : अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) च्या लग्नाची तारीख जवळ येत आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.
Katrina Kaif & Vicky Kaushal wedding : अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) च्या लग्नाची तारीख जवळ येत आहे. या दोघांनीही अद्याप लग्नाबाबतच्या कोणत्याही बातमीला दुजोरा दिलेली नाही. मीडिया रिपोर्टसनुसार यांचं लग्न 7-10 डिसेंबरला राजस्थानमध्ये होणार आहे. कतरिना आणि विकीने लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, कतरिना आणि विकी डिसेंबरमध्ये शाही विवाह करणार अशी जोरदार चर्चा आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या राजस्थानमध्ये पार पडणाऱ्या शाही विवाह सोहळ्याची जंगी तयारी सुरु असल्याचं बोललं जातंय. त्यातच त्याच्या लग्नासंबंधित रोज नवीन माहिती समोर येत आहे. कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत.
काय आहेत अटी?
रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे. इवेंट मॅनेजमेंट कंपनीलाही यासंदर्भात सक्त ताकीद देण्यात आली आहे की, पाहुण्यांना मोबाईल वापरण्यास परवानगीर नसेल. याचं कारण म्हणजे त्यांना लग्नातील फोटो लीक होण्याची भीती आहे. याशिवाय दुसरी अट म्हणजे, पाहुण्यांना नॉन डिस्क्लोजर अॅग्रीमेंट (NDA) मान्य करावी लागेल ज्यामध्ये पाहुण्यांना लग्नादरम्यान फोटो काढण्यास परवानगी नसेल. तसेच लग्नासंबिंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ त्यांना सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही. कतरिना आणि विकीच्या लग्नात आमंत्रित पाहुण्यांनाच परवानगी असेल. लग्नासाठी आमंत्रित पाहुण्यांना सीक्रेट कोड देण्यात येतील. हे सीक्रेट कोड कतरिना आणि विकीच्या नावाशी संबंधित असतील अशी माहिती आहे. या शाही विवाह सोहळ्यासाठी मोजक्या लोकांना आमंत्रण दिल्यामुळे त्यांचा काही मित्रपरिवार दु:खी असल्याचंही बोललं जातं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकी राजस्थानमध्ये होणाऱ्या शाही विवाह सोहळ्याआधीच मिसेज अँड मिस्टर कौशल बनणार आहेत. कतरिना आणि विकी शाही विवाह सोहळ्याआधी कोर्ट मॅरेज करणार असल्याचंही बोललं जातंय. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही शाही विवाह सोहळ्यासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी पुढील आठवड्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. त्यामुळे कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नासाठी त्चाचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत.
इतर बातम्या :
- Ileana Dcruz Bikini Look : मालदिवमध्ये इलियाना डिक्रूजचा बोल्ड लूक
- Vicky - Katrina Wedding : आली समीप लग्नघटीका, विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाची लगीनघाई सुरू
- The Railway Men : भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित नवी वेब सीरिज; आर माधवनची प्रमुख भूमिका