Karkhanisanchi Waari : 'प्रवाह पिक्चर पुरस्कार' सोहळ्यात एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेला 'कारखानिसांची वारी' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
Karkhanisanchi Waari : एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानिसांची वारी' या सिनेमाने 'प्रवाह पिक्चर पुरस्कार' सोहळ्यात बाजी मारली आहे.
Karkhanisanchi Waari : 'कारखानीसांची वारी' (Karkhanisanchi Waari) हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने बाजी मारली आहे. आता प्रवाह पिक्चर पुरस्कार' सोहळ्यात एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेला 'कारखानिसांची वारी' हा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला आहे.
मराठी कलाविश्वातील दिग्गजांच्या उपस्थितीत नुकताच 'प्रवाह पिक्चर पुरस्कार' सोहळा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात 'कारखानिसांची वारी' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संवाद लेखक, सर्वोत्कृष्ट पात्र योजना अशा अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे.
'कारखानीसांची वारी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मंगेश जोशी यांनी सांभाळली आहे. या सिनेमात मोहन आगाशे, वंदना गुप्ते, अमेय वाघ, प्रदीप वेलणकर, गीतांजली कुलकर्णी आणि शुभांगी गोखले अशी तगडी स्टारकास्ट आहे. एकत्रित कुटुंबावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. एकत्रित कुटुंबाचं भावविश्व उलगडण्याचं काम या सिनेमाने केलं आहे.
'आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'कारखानीसांची वारी'चा डंका
View this post on Instagram
'कारखानीसांची वारी' या सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल गाजवले आहेत. इफ्फी, टोकियो फिल्म फेस्टिव्हल सारख्या अनेक फिल्म फेस्टिव्हलचा यात समावेश आहे. 'प्रवाह पिक्चर पुरस्कार' सोहळ्याआधी या सिनेमाने 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात' सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच 'मटा सन्मान 2022' मध्ये या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचे नामांकन मिळाले होते. फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील 'कारखानीसांची वारी' या सिनेमाचा सहभाग होता.
संबंधित बातम्या