एक्स्प्लोर

Bollywood News : 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री, गोविंदासोबत सुपरहिट जोडी; महाफ्लॉप चित्रपटानंतर 12 वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर

Bollywood News : 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री, गोविंदासोबत सुपरहिट जोडी; महाफ्लॉप चित्रपटानंतर 12 वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर

Bollywood Actress Career : 90 च्या दशकात या अभिनेत्रीचा जलवा होता. या अभिनेत्री गोविंदासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या सौंदर्यवान अभिनेत्रीचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. मात्र ही अभिनेत्री मागील दशकापेक्षा अधिक काळ इंडस्ट्रीपासून दूर आहे. ही अभिनेत्री 12 वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. 2012 मध्ये या अभिनेत्री एक चित्रपट रिलीज झाला होता, जो चांगलाच फ्लॉप ठरला, त्यानंतर ही अभिनेत्री पुन्हा मोठ्या पडद्यावर परतलेली नाही.

90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नाव आणि स्टारडम कमावण्यासाठी लाखो लोक येतात. काहींना झटकन प्रसिद्धी मिळते, तर काही जण आयुष्यभर मेहनत करतात पण, तरीही त्यांना चांगला प्रोजेक्ट मिळत नाही. याउलट काही लोक असेही असतात, ज्यांना भरपूर प्रसिद्धी आणि स्टारडम मिळतं. मात्र, बॉलिवूड अशी इंडस्ट्री आहे, जिथे कुणाचं नशीब कधी पलटेल काही सांगता येत नाही. एका वेळेला एकामागोमाग एक हिट चित्रपट देणारी अभिनेत्री अचानक अशी गायब झाली की, 12 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. एक काळ असा होता, जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये या अभिनेत्रीचा बोलबाला होता. ही अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर.

फ्लॉप चित्रपटानंतर 12 वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर

करिश्मा कपूर 90 च्या दशकातील बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. करिश्माने गोविंदासोबत सर्वाधिक चित्रपट केले आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या खूप जास्तच पसंतीस पडली होती. यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. पण, 2012 मध्ये करिश्माचा एक चित्रपट महा-फ्लॉप ठरला, त्यानंतर तिने चित्रपटात काम केलेलं नाही. सध्या करिश्मा ओटीटी आणि टेलिव्हिजन शोमध्ये झळकताना दिसत आहे.

2012 मध्ये सुपरफ्लॉर चित्रपटानंतर इंडस्ट्रीपासून दुरावा

2012 मध्ये डेंजरस इश्क थिएटरमध्ये रिलीज झालेला करिश्मा कपूरचा शेवटचा चित्रपट ठरला, त्यानंतर तिने मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिका केलेली नाही.  या चित्रपटात करिश्मा कपूरसोबत  रजनीश दुग्गल, जिमी शेरगिल आणि दिव्या दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत होते. मात्र, 26 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 8 कोटी रुपये कमाई केली. यामुळे हा चित्रपट सूपरफ्लॉप ठरला.

पहिल्याच चित्रपटापासून मिळाली प्रसिद्धी

करिश्मा कपूरने खूप लहान वयात फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. वयाच्या 17 व्या वर्षी करिश्मा कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्रेम कैदी' चित्रपटातून तिने अभिनयाला सुरुवात केली. या चित्रपटात करिश्मा कपूर आणि हरीश कुमार यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडली. पहिल्याच चित्रपटापासून करिश्माला प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही.
Bollywood News : 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री, गोविंदासोबत सुपरहिट जोडी; महाफ्लॉप चित्रपटानंतर 12 वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर

गोविंदासोबत सुपरहिट जोडी

करिश्मा कपूरने गोविंदासोबत पहिल्यांदा 'मुकाबला' (1993) चित्रपटात काम केले होते. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. यानंतर गोविंदा आणि करिश्मा कपूरने 'राजा बाबू', 'साजन चले ससुराल', 'कुली नंबर 1', 'हिरो नंबर 1', 'हसीना मान जाएंगे', 'खुद्दार', 'शिकारी' आणि 'शिकारी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. 'प्रेम शक्ती' मध्ये काम केले आहे.

Bollywood News : 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री, गोविंदासोबत सुपरहिट जोडी; महाफ्लॉप चित्रपटानंतर 12 वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर

महत्त्वाच्या इतर बातम्या :

सुपरस्टारवर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेता किच्चा सुदीपच्या आईचं निधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तब्बल 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट आजही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : मुंबईतून पोलीस दलातील शहिदांना मानवंदनाTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 21 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  8 AM :  21 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तब्बल 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट आजही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
मुंबईतील 'या' मतदारसंघात रंगणार गुरु-शिष्याची लढाई, 48 मतांनी हरलेला उमेदवारही चर्चेत
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
जयंत पाटील मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंसोबत तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा, नेमकी काय झाली चर्चा?
जयंत पाटील मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंसोबत तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा, नेमकी काय झाली चर्चा?
"मला तुमच्या बायकोशी लग्न करायचंय..."; गायिकेवरच्या प्रेमासाठी प्रसिद्ध गायकानं ओलांडल्या मर्यादा, पतीकडेच मागितलेला 'तिचा' हात
South Africa Women vs New Zealand Women : न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी घरात मिळून सुद्धा थेट मुंबईकडे धाव!
लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी घरात मिळून सुद्धा थेट मुंबईकडे धाव!
Embed widget