एक्स्प्लोर
सारा अली खानच्या पदार्पणाबाबत करिना म्हणते...
सारा अत्यंत छान भूमिका करेल, याची मला खात्री आहे. ब्यूटी आणि ब्रेन यांचा सुंदर मिलाफ तिच्याकडे असल्याचं करिना कपूरला वाटतं
मुंबई : 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान पदार्पण करत आहे. साराच्या बॉलिवूड डेब्यूबाबत सैफची दुसरी पत्नी अर्थात अभिनेत्री करिना कपूरही प्रचंड उत्सुक आहे.
'ती अत्यंत छान भूमिका करेल, याची मला खात्री आहे. ब्यूटी आणि ब्रेन यांचा सुंदर मिलाफ साराकडे आहे. मी तिच्या पदार्पणाबाबत प्रचंड एक्सायटेड आहे. हा चित्रपट चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे.' असं करिनाने 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
केदारनाथ चित्रपटात सारा अली खान सोबत सुशांत सिंग राजपूत झळकणार आहे. अभिषेक कपूरने दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
गेल्या आठवड्यात सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. हिमालयातले डोंगर, मंदिर आणि शिवशंकराची मूर्ती या पोस्टरवर दिसतात. केदारनाथ तीर्थयात्रेदरम्यान ही प्रेमकथा उलगडत जाते. जून 2018 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement