एक्स्प्लोर

'ऐ दिल..'च्या प्रदर्शनासाठी करण जोहर राजनाथ यांच्या दारी

नवी दिल्ली : 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाची मुश्किल वाढल्यानं दिग्दर्शक करण जोहर थेट गृहमंत्र्यांना साकडं घालण्याच्या तयारीत आहे. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक मुकेश भट्ट यांच्यासह काही कलाकार दुपारी 12 वाजता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. करण जोहरने चित्रपट प्रदर्शित करु देण्याची विनंती केल्यानंतरही मनसेनं आपला पवित्रा कायम ठेवला आहे. मल्टिप्लेक्स चालकांनी पाक कलाकारांचे चित्रपट दाखवल्यास मनसेची कामगार संघटना कामबंद आंदोलन पुकारेल असा इशारा देण्यात आला आहे. करण जोहरच्या विनंतीला मनसेनं कचऱ्याची टोपली दाखवली. आधी चले जावची हाक देऊन तोडफोडीचा इशारा दिलेल्या मनसेनं आता असहकार पुकारला आहे. जर मल्टिप्लेक्समध्ये ‘ऐ दिल है मुश्कील’ प्रदर्शित केला तर मनसेची कर्मचारी संघटना कामबंद आंदोलन करेल अशी घोषणा मनसेनं केली आहे. पीव्हीआर, सिनेपोलिस, कार्निवलसह इतर सिनेमा थिएटर्समध्ये 70 टक्के कर्मचारी मनसे कामगार संघटनेचे आहेत. मल्टिप्लेक्समधील तंत्रज्ञ, सुरक्षारक्षक आणि चतुर्थश्रेणी कर्मचारीही मनसेशी बांधील आहेत. त्यामुळे मनसे कर्मचारी संघटनेनं संप पुकारला तर थिएटर्स चालणं मुश्कील होईल चित्रपट प्रदर्शित करु द्या “ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा शूट केला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा प्रदर्शित होऊ द्यावा, यापुढे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमा करणार नाही”, अशी विनंती करण जोहरने केली होती. उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधी वातावरण आहे. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकार असलेले “ऐ दिल है मुश्किल” आणि रईस हे सिनेमे प्रदर्शित न करण्याचा इशारा दिला आहे. तसंच मनसेने पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडण्यासही सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर करण जोहरने आपली पहिली प्रतिक्रिया दिली. करणची पोलिस आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेने विरोध केल्यानंतर दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने पोलिसात धाव घेतली होती. मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे करणने सुरक्षेची मागणी केली. त्यानंतर पुरेशी सुरक्षा देण्याचं आश्वासन मुंबई पोलिसांनी दिलं आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या टीमने पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्याचप्रमाणे फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश भट्ट, फॉक्स स्टार इंडियाचे सीईओ विजय सिंह, मामि फिल्म फेस्टिव्हलच्या अनुपमा चोप्रा, निर्माते सिद्धार्थ रॉय कपूरही यावेळी उपस्थित होते. मल्टिप्लेक्सच्या काचा महागड्या असतात ‘ऐ दिल..’ प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना दिला आहे. मनसेने पत्र लिहून मल्टिप्लेक्स चालकांना ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी केली. तसं न केल्यास मनसे स्टाईल विरोधाला सामोरं जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले चित्रपट प्रदर्शित करण्यास मनसेने विरोध दर्शवला आहे. ‘मल्टिप्लेक्सच्या काचा खूप महागड्या असतात हे विसरु नका’ असा दमही मनसेने भरला आहे. ऐ दिल है मुश्किलचा वाद काय आहे? ‘ऐ दिल है मुश्किल’ या करण जोहरच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका आहे. पाकिस्तानी कलाकारांना आपल्या सिनेमात घेऊ नये, यासाठी मनसेने आवाज उठवला होता. त्यानंतर फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडला. मात्र, करण जोहरच्या सिनेमात फवादची भूमिका असल्याने तो वादात सापडला. सिंगल स्क्रिन थिएटर असोसिएशन आणि सिनेमा ओनर असोसिएशनने करण जोहरचा सिनेमा थिएटरमध्ये न प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 28 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

संबंधित बातम्या :

मनसेचे मल्टिप्लेक्समधील कामगारही पाक कलाकारांविरोधात

माजी क्रिकेटर संजय मांजरेकरची मनसेवर बोचरी टीका

यापुढे पाक कलाकारांना सिनेमात घेणार नाही : करण जोहर

मोदींकडून माफीची मागणी केलीच नव्हतीः अनुराग कश्यप

पाकिस्तानी कलाकारांबाबत मुकेश अंबानी म्हणतात…

पाक कलाकारांबाबत आमीरची पत्नी म्हणते…

‘ऐ दिल..’ प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

मोदीजी, पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी कधी मागताय? : अनुराग कश्यप

भारत-पाक संबंधांवरुन फिल्मस्टारच टार्गेट का? : प्रियंका

माहिरा खानची ‘रईस’मध्ये रिप्लेसमेंट नाही, निर्मात्याचे संकेत

‘ऐ दिल..’मध्ये फवादच्या चेहऱ्यावर ‘या’ हिरोचा मुखवटा

पाक कलाकार असलेले चित्रपट दाखवणार नाही, सिंगल स्क्रीन थिएटर मालकांचा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray : 'एक अनर्थमंत्री, एक नगरभक्ती मंत्री, तिसरे गृहखलन मंत्री'
Mumbai Monorail Accident : मोनोरेलचा कारभार, अडचणींचा सिग्नल? Special Report
Pune Leopard : नरभक्षक बिबट्या ठार, पण दहशत संपणार कधी? Special Report
Central Team Inspection Maharashtra: अंधारातली पाहणी, 'व्यवस्थे'ची कहाणी Special Report
Uddhav Thackeray Marathwada : बांधावर ठाकरे, सरकारवर फटकारे Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Embed widget