Karan Johar Quits Twitter: करण जोहरचा ट्विटरला अलविदा; नेटकरी म्हणाले, 'भारतामध्ये सुख, शांती...'
नुकतच एक ट्वीट करणनं शेअर केलं. या ट्वीटमधून त्यानं सांगितलं की, तो ट्विटर अकऊंट बंद करत आहे. करणनं हे ट्वीट शेअर केल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.
Karan Johar Quits Twitter: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि कॉफी विथ करण या कार्यक्रमामुळे चर्चेत असतो. नुकतच एक ट्वीट करणनं शेअर केलं. या ट्वीटमधून त्यानं सांगितलं की, तो ट्विटर अकऊंट बंद करत आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं. करणनं हे ट्वीट शेअर केल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.
करणनं शेअर केलं ट्वीट
'पॉझिटिव्हग एनर्जी मिळवण्यासाठी आयुष्यात जागा निर्माण करत आहे.त्यासाठी हे पहिलं पाऊल उचललं आहे. गुडबाय ट्विटर', असं ट्वीट शेअर करुन करणनं ट्विटर अकऊंट बंद केलं. त्याचं हे ट्वीट पाहून अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
करणचं ट्वीट:
नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'सर, पूर्ण भारतामध्ये सुख, शांती असावी असं तुम्हाला वाटतं असेल तर कॉफी विथ करण नावाचा कचरा इंटरनेटवरुन काढून टाका' असं ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'हे अकाऊंट बंद करुन एक अनोळखी अकाऊंट वापरेल' तर एका युझरनं ट्वीट केलं, 'तुला कोणीच मिस करणार नाही'
सर पूरे इंडिया में सुख शांति चाहते हो तो "कॉफी विद करण" वाला कचरा भी इंटरनेट से हटा दो 😊
— Smeera #फ़ॉलोबेक✍️ (@Smeera_Singh) October 10, 2022
Yeh account band karke ek unknown account use karega
— JON ¥ $NOW (@RebelKingSnow) October 10, 2022
करणच्या कॉफी विथ करणचा सातवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सीझनमध्ये अनेक सेलिब्रीटींनी हजेरी लावली. ओटीटीवर रिलीज झालेल्या या कार्यक्रमाला अनेकांची पसंती मिळाली. पण काहींनी मात्र या कार्यक्रमाला ट्रोल केलं. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सीझन रिलीज झाला होता.
करणचे आगामी चित्रपट
रॉकी औरक रानी की प्रेम कहानी आणि योध्दा हे करणचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: