मेरो करण-अर्जुन आयेंगे... सलमान-शाहरुखचा आयकॉनिक चित्रपट 29 वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर, 'या' दिवशी रिलीज होणार
Karan Arjun Re-Release : सलमान खान आणि शाहरुख खानचा 90 च्या दशकातील चित्रपट करण अर्जून मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
Karan Arjun Movie Re-Release : बॉलिवूडचे अनेक आयकॉनिक सिनेमे आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये खास स्थान निर्माण करुन आहेत. बॉलिवूडचे अनेक कल्ट चित्रपट आजही तितक्याच उत्सुकतेने पाहिले जातात. यामधील एक चित्रपट करण अर्जुन चित्रपट. सलमान खान आणि शाहरुख खान यांचा करण अर्जुन चित्रपट बॉलिवूडच्या कल्ट ऑयकॉनिक चित्रपटांपैकी एक आहे. दरम्यान, अलिकडे जुने चित्रपट रि-रिलीज करण्याचा ट्रेंड सुरु आहे. यामुळे आता सलमान खान आणि शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे.
करण अर्जुन चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार
सलमान खान आणि शाहरुख खानची जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. दिग्दर्शक राकेश रोशन यांचा करण अर्जुन चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात पाहता येणार आहे. 29 वर्षांनंतर करण अर्जुन चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहता येणार आहे. ही जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. राकेश रोशन यांनी हा चित्रपट पुन्हा बॉक्स ऑफिसवर धडकणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
शाहरुख-सलमानची जोडी पुन्हा रुपेरी पडद्यावर
राकेश रोशन यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलंय, 'करण अर्जुन आ रहे हैं. 22 नोव्हेंबर 2024 पासून जगभरातील सिनेमागृहांमध्ये पुनर्जन्माचे साक्षीदार व्हा'.
बॉक्स ऑफिसवर पुन्हा सलमान-शाहरुखचा धमाका
View this post on Instagram
मेरे करण अर्जुन आयेंगे...
ह्रतिकने इंस्टाग्राम अकाऊंटवर करण अर्जुन चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना ह्रतिक रोशनने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'सिनेमा पुन्हा पूर्वीसारखा नव्हता, जेव्हा करण अर्जुन पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र आला होता. 22 नोव्हेंबर 2024 पासून जगभरातील थिएटरमध्ये करण अर्जुनचा पुनर्जन्म पुन्हा जिवंत करा'!
29 वर्षांनंतर करण अर्जुन पुन्हा मोठ्या पडद्यावर
दिग्दर्शक राकेश रोशन यांनी सोशल मीडियावर, सलमान खान आणि शाहरुख खान स्टारर करण अर्जुन सिनेमागृहात परतणार असल्याची घोषणा केली आहे. करण अर्जुन चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा हा चित्रपट हिट झाला होता. 29 वर्षांनंतर आता करण अर्जुन चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :