Kapil Sharma : कपिल शर्माने खरेदी केलं प्रायव्हेट जेट? पत्नी गिन्नीसोबत स्वॅगमध्ये एन्ट्री; फोटो पाहून चाहते चकित
Kapil Sharma Buy Private Jet : कॉमेडीयन कपिल शर्माने सोशल मीडियावर पत्नी गिन्नीसोबत प्रायव्हेट जेटमधून उतरतानाचा फोटो शेअर केला असून हा सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
Kapil Sharma Buy Private Jet Rumours : बॉलिवूडमधील मल्टीटॅलेंटेड कलाकार कपिल शर्मा कॉमेडीयन आणि अभिनेता असण्यासोबतच उत्तम गायकही आहे. कपिल शर्मा लवकरच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी कपिल शर्मा व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून पत्नी गिन्नीसोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. कपिलने सुट्टीमध्ये पत्नी गिन्नीसोबत फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. फोटोमध्ये कपिल शर्मा पत्नीसोबत प्रायव्हेट जेटमधून फिरताना दिसत आहे.
कपिल शर्माने खरेदी केलं प्रायव्हेट जेट?
कपिल शर्माने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पत्नी गिन्नीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे, या फोटोमध्ये तो एका खासगी जेटमधून खाली उतरताना दिसत आहे. कपिल शर्मा स्वॅगमध्ये एन्ट्री घेताना फोटोत दिसत असून त्याच्यासोबत गिन्नीही फार सुंदर किसत आहे. या फोटोमध्ये प्रायव्हेट जेट पाहिल्यानंतर यूजर्सकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. कपिल शर्माने प्रायव्हेट जेट विकत घेतल्याच्या चर्चांना यामुळे उधाण आलं आहे.
कपिल शर्माची पत्नी गिन्नीसोबत स्वॅगमध्ये एन्ट्री
कपिल शर्मा नेटफ्लिक्सच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या पुढच्या सीझनसह प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. 21 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2 लाँच होत आहे. त्याआधी कपिल शर्मा फिरण्याचा आनंद घेत आहे. त्याच्या सोशल मीडियावर तो यासंदर्भातील अपडेट्स शेअर करत आहे. आता प्रायव्हेट जेटच्या फोटो शेअर करताच त्याकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
फोटो पाहून चाहते चकित
View this post on Instagram
कपिल शर्मा आणि गिन्नी शर्माचा स्वॅग लूक
या पोस्टमध्ये कपिल शर्माने पांढऱ्या जॅकेटसोबत गडद निळ्या रंगाची जीन्स, पांढरे शूज आणि सनग्लासेस अशा कूल लूकमध्ये दिसतआहेत. आणि तिचा तिला आणखीनच डॅशिंग बनवत आहे. तर, फोटोमध्ये त्याच्या शेजारी पत्नी गिन्नी देखील निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फार सुंदर दिसत आहे. या दोघांकडे बघून चित्रपटातील मुख्य कलाकारांची एन्ट्री झाल्यासारखे वाटत आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पूर
कपिल शर्माने त्याच्या पोस्टच्या खाली कॅप्शन लिहिले आहे, "आईये हुजूर". कपिल शर्माचा प्रायव्हेट जेटसोबतचा फोटो पाहिल्यानंतर यूजर्सकडून अनेक प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, "प्रायव्हेट जेट दाखवण्याचा मार्ग थोडासा कॅज्युअल आहे." तर, दुसऱ्याने लिहिले, "भाऊ गरीब असताना चार्टर्ड विमान विकत घेतलं का?" आणखी एकाने लिहिलंय, "भाई गरीब-गरीब म्हणता म्हणता चार्टेड प्लेन खरेदी केलं". कॉमेडी क्वीन भारती आणि गायक बिप्राक सारख्या सेलिब्रिटींनी देखील या पोस्टवर प्रतिक्रिया इमोजीसह प्रतिक्रिया दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :