तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरी आयटी छाप्यानंतर कंगना रनौतचे ट्विट
Bollywood: कंगना रनौतने कर चुकवण्याबरोबरच काळ्या पैशाच्या व्यवहाराचे गंभीर आरोप केलेत. मात्र, तिने कोणाचेही नाव घेतले नाही.
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांची बुधवारी सकाळपासून इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरु आहे. अशा परिस्थितीत कंगना रनौतने आपली प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केले आहे. आज कंगनाने ट्विट करुन दोघांवरील आपला राग व्यक्त केला आहे. कर चुकवण्याबरोबरच काळ्या पैशाच्या व्यवहाराचेही गंभीर आरोप तिने केले. मात्र, तिने कोणाचेही नाव घेतले नाही.
काय म्हणाली कंगना? कंगना रनौतने आपल्या ट्विटमध्ये लिहलंय की कर चोरीच नाही तर काळ्या पैशाचाही मोठा व्यवहार झाला आहे, त्यांना हा पैसा प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेली हिंसा आणि शाहीन बाग आंदोलनाला भडकवण्यासाठी मिळाला होता का? हा काळा पैसा कोठून कुठे पाठवण्यात आला याचा हिशोब कोणाकडेही नाही. कंगनाचे हे ट्विट येताच व्हायरल झाले आहे. कंगनाच्या या ट्विटवरही युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
They are not just #TaxChor huge transactions of black money has happened, did they get that money for provoking #Shaheenbagh riots or #republicdayviolence ... From where the black money came and where did they send the black money which isn’t accounted for ? https://t.co/XSUhBQYpKA
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 4, 2021
आयटीच्या छाप्यानंतर सात लॉकर सील तापसी आणि अनुरागच्या घरांवर छापे टाकल्यानंतर सात लॉकर सील करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तपासात 350 कोटींची फसवणूक उघडकीस येऊ शकते. वास्तविक, हे संपूर्ण प्रकरण आयकर चुकवण्याबाबत आहे. या संदर्भात 28 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. आयटी विभागाने फँटम फिल्म्सच्या वार्षिक आयकर विवरण परताव्याची तपासणी केली, तेव्हा थोडी गडबड झाली असल्याचा संशय निर्माण झाल्याने ही संपूर्ण कारवाई चालू करण्यात आली. तपासादरम्यान काही प्रश्नांची उत्तरे योग्यप्रकारे मिळाली नसल्याचीही बातमी आहे, यामुळे या सेलिब्रीटींना आयटी कार्यालयात बोलावून घेऊन विचारपूस केली जाऊ शकते.