Kangana Ranaut : "स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच"; 'पंगाक्वीन' कंगना रनौतचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Kangana Ranaut On Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतच्या ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
![Kangana Ranaut : Kangana Ranaut On Uddhav Thackeray Shiv sena after election commission shiv sena party name election symbol on Eknath Shinde Kangana Ranaut :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/081650eb8891fde95342ed333027bace1676683054925254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kangana Ranaut On Uddhav Thackeray : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौत (Kangana Ranaut) वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेना नाव (Shiv sena) आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर कंगनाने ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.
कंगनाने लिहिलं आहे, "वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही".
कुकर्म करने से तो देवताओं के राजा इन्द्र भी स्वर्ग से गिर जाया करते हैं, वो तो सिर्फ़ एक नेता है, जब उसने अन्याय पूर्व मेरा घर तोड़ा था, मैं समझ गई थी, ये शीघ्र ही गिरेगा, देवता अच्छे कर्मों से उठ सकते हैं लेकिन स्त्री का अपमान करने वाले नीच मनुष्य नहीं… ये अब कभी उठ नहीं पाएगा।
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 17, 2023
उद्धव ठाकरेंचं सरकार असताना कंगनाच्या घराचा काही भाग मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाणे पाडला होता. त्यावेळीदेखील कंगना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती, "आज माझं घर पाडलं आहे, उद्या तुमचा गर्व मोडून पडेल. प्रत्येकाची वेळ येते...लक्षात असूद्या".
आरोह वेलणकरकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान अभिनेता आरोह वेलणकरने ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे. त्याने लिहिलं आहे, "अभिनंदन एकनाथ शिंदे... बाळासाहेब पण खूश असतील आज". आरोहच्या या ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Congratulations @mieknathshinde !! बाळासाहेब पण खूष असतील आज...
— Aroh Welankar (@ArohWelankar) February 17, 2023
कंगनाचा 'इमर्जन्सी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
कंगना रनौतचा आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात ती अभिनेत्री म्हणून झळकण्यासोबत दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या
Kangana Ranaut : 'आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा'.. पंगा क्वीन कंगना रनौतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)