एक्स्प्लोर

Kangana Ranaut : सलग फ्लॉप देणाऱ्या कंगनाने आता हुकुमाचा एक्का काढला; 'या' अभिनेत्यासोबत पुन्हा झळकणार

Kangana Ranaut Latest News : आपल्या चित्रपटाकडे पाठ फिरवणाऱ्या प्रेक्षकांना पुन्हा तिकीटबारीकडे वळवण्यासाठी कंगनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत

Kangana Ranaut : अनेक दिवसांपासून एकामागून एक फ्लॉप चित्रपट देणाऱ्या कंगना रनौतने (Kangna Ranaut) आता हुकुमाचा एक्का  बाहेर काढला आहे. कंगनाला मागील काही चित्रपटांपासून बॉक्स ऑफिसवर अपयश पाहावे लागत आहे. आपल्या चित्रपटाकडे पाठ फिरवणाऱ्या प्रेक्षकांना पुन्हा तिकीटबारीकडे वळवण्यासाठी कंगनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कंगनाने आता आर. माधवन (R. Madhavan) सोबत चित्रपट करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'या सुपरहिट चित्रपटातील जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 

माधवनसोबत काम करणार असल्याची माहिती कंगना रनौतने सोशल मीडियावर युजर्ससोबत शेअर केली आहे. कंगना रनौतने  इंस्टाग्राम स्टोरीवर आर माधवनसोबतचा तिचा सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीसोबत तिने कॅप्शनही लिहिले आहे. माझ्या आवडत्या आर माधवनसोबत आणखी एका उत्तम स्क्रिप्टसह परत येत आहे, असे कंगनाने म्हटले. 

Kangana Ranaut : सलग फ्लॉप देणाऱ्या कंगनाने आता हुकुमाचा एक्का  काढला; 'या' अभिनेत्यासोबत पुन्हा झळकणार

याशिवाय तिने आणखी एक फोटो शेअर केला असून त्यात ती काही लोकांसोबत बसलेली दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये  तिने किती छान टीम आहे, असे म्हटले. 

माधवन यांचे करिअर खराब करणार का? नेटकऱ्यांचा सवाल

कंगनाच्या या स्टोरीवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. कंगना रनौत आता माधवनचे करियर खराब करेल, माधवन जी कंगनापासून अंतर ठेवा, अन्यथा ती तुमचेही करिअर खराब करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही असेही एका युजरने म्हटले. तर, एका यूजरनेचला, कोणीतरी तिची आवडती आहे, नाहीतर ती सर्वांच्या विरोधात आहे असे म्हटले. 

याआधीदेखील माधवनसोबत कंगनाने केलंय काम 

कंगनाने याआधी आर. माधवनसोबत 'तनू वेड्स मनू' आणि त्यानंतर त्याचा सिक्वेल 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'मध्ये एकत्र काम केले आहे. 'धाकड' आणि 'तेजस' हे शेवटचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. त्याआधी 'मणिकर्णिका'याने सरासरी व्यवसाय केला.  त्यानंतरचे 'पंगा' आणि 'थलाईवी' सारखे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले आहेत.

आगामी 'एमर्जन्सी' चित्रपटाची चर्चा

सध्या कंगना तिच्या आगामी 'एमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या पॉलिटिकल ड्रामा चित्रपटात कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत श्रेयस तळपदे, अनुपम खेर, महिमा चौधरी आणि पुपुल जयकर हे देखील दिसणार आहेत. विशेष म्हणजे कंगना या चित्रपटात अभिनयासोबतच दिग्दर्शनही करत आहे.

इतर संबंधित बातमी :

Kangana Ranaut : अभिनय क्षेत्राला 'राम, राम' करून कंगणा रनौत पंतप्रधान होणार? म्हणाली, तुम्ही...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget