मुंबईत 14 सप्टेंबरपर्यंत राहणार कंगना; BMC कडून होम क्वॉरंटाईन नियमांमधून सूट
कोरोना व्हायरस महामारीच्या नियमांनुसार, राज्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहावं, असा मुंबईत नियम आहे. परंतु, कंगनाला होम क्वॉरंटाईन नियमांमधून सूट देण्यात आली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या गैरहजेरीत मुंबई महानगरपालिकेने तिच्या 'मणिकर्णिका फिल्म्स' कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम बीएमसीने पाडलं. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने यावर स्थगिती दिली. या प्रकरणी आज उच्च न्यायालय पुन्हा सुनावणी होणार आहे. वाय प्लस सुरक्षेत कंगना काल मुंबईत दाखल झाली आणि आपल्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिथे तिने बीएमसीने केलेल्या कारवाईचा व्हिडीओ लोकांसोबत शेअर केला. त्यानंतर कंगना मुंबईतील आपल्या घरी गेली. सध्या कंगना मुंबईतील आपल्या फ्लॅटमध्ये आहे. दरम्यान, कंगना मुंबईत आल्यानंतर बीएमसी तिला होम क्वॉरंटाईन करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु, बीएमसीने कंगनाला होम क्वॉरंटाईन केलेलं नाही.
कोरोना व्हायरस महामारीच्या नियमांनुसार, राज्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहावं, असा मुंबईत नियम आहे. परंतु, कंगनाला क्वॉरंटाईन राहण्याची गरज नाही. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाला 14 दिवसांसाठी होम क्वॉरंटाईनच्या नियमांमधून सूट देण्यात आली आहे.
14 सप्टेंबरपर्यंत मुंबईत राहणार कंगना
बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना रनौतला होम क्वॉरंटाईन होण्यापासून सूट देण्यात यावी, या मागणीसाठी एक ऑनलाईन अर्ज केला होता. कारण ती येथे काही दिवसांसाठीच आली आहे. अधिकारी म्हणाले की, 'कंगना येथे एक आठवड्यापेक्षाही कमी वेळेसाठी आली आहे. त्यामुळे तिला सूट देण्यात आली आहे.' एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंगना 14 सप्टेंबर रोजी मुंबईहून पुन्हा हिमाचल प्रदेशला जाणार आहे.
कंगनाने केली होती कोरोना टेस्ट
कंगना रनौत बुधवारी हिमाचल प्रदेश मधील मंडी येथे असेल्या आपल्या गावाहून मुंबईला पोहोचली. तिने गावाहून निघण्यापूर्वी आपली कोरोना टेस्ट केली होती. त्याचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. कंगनासोबत तिची बहिण रंगोली आणि इतर काही लोक होते. त्यांनीही कोरोना टेस्ट केली होती. त्यांचेही रिपोर्ट नेगेटिव्ह आले होते.
महत्त्वाच्या बातम्या :
- खारच्या फ्लॅटवरुन कंगनाचं शरद पवारांकडे बोट, जितेंद्र आव्हाडांचं कंगनाला उत्तर
- मुंबईत बेकायदेशीर बांधकाम नवीन नाहीत, अशा कारवाईने लोकांच्या मनात शंका निर्माण करण्यास संधी; शरद पवारांचा घरचा आहेर
- आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा; मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत कंगनाची टीका
- कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात
- बीएमसीने कंगनाला पाठवलेली नोटीस बेकायदेशीर; कंगना रनौतच्या वकिलांचा आरोप
- कंगना रनौतच्या ऑफिसला महापालिकेकडून नोटीस; रहिवाशी जागेचा कार्यालयीन वापर केल्याचा कंगनावर ठपका