BMC Election 2026 Election Commission: आधी PADU मशीन अन् शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय, मतदान केंद्राच्या आत...
BMC Election 2026 Election Commission: PADU मशीननंतर आता मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचा अजब कारभार समोर आला आहे.

BMC Election 2026 Election Commission: मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचा अजब कारभार समोर आला आहे. माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात सोडण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या ऐनवेळी निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहे. (Mumbai Municipal Corporation Election 2026)
अधिकृत प्रवेशिका असतानाही मतदान केंद्रात माध्यम प्रतिनिधींना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. केवळ रांगेच चित्रीकरण करण्यास परवानगी असल्याची निवडणूक आयोगाची भूमिका आहे. मुंबई वगळता इतरत्र मात्र माध्यम प्रतिनिधींची कुठेही अडवणूक केली जात नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (BMC Election 2026)
निवडणूक आयोगाने 'पाडू' मशीन आणलं- (PADU Machine)
निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचं नवीन मशीन आणलं आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (PADU) मशीन असं त्याचे नाव आहे. ते उद्या सगळीकडे ठेवलं जाणार आहे. ईव्हीएम बंद पडलं, तर हे मशीन वापरलं जाणार आहे. पण याबाबत कोणतीही माहिती निवडणूक आयोगाने दिली नव्हती. ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही?, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला. तर PADU मशीन अपवादात्मक परिस्थितीमध्ये वापरलं जाणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
प्रचार कालावधी संपल्यानंतरही उमेदवाराला घरोघर प्रचार करण्याची मुभा- (State Election Commission, Maharashtra)
कालच निवडणूक आयोगाने आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न घेतलेला निर्णय घेतला होता. प्रचार कालावधी संपल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेतील उमेदवाराला घरोघर प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली होती. राजकीय पक्ष आणि उमेदवारांना 13 जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. परंतु त्यानंतरही 15 जानेवारीपर्यंत ते घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची पत्रके वाटता येणार नाहीत, असे निवडणूक आयोगाने इतिवृत्तामध्ये नमूद केले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतरही विविध सवाल उपस्थित करण्यात आले होते.
नागरिकांच्या मतदान केंद्रावर रांगा- (Municipal Corporation Election 2026)
29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडते आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होईल मात्र त्यासाठीच नागरिकांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्याचं चित्र आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांमध्ये उत्साह दिसतो आहे. तर अनेक वर्षांनी पालिकेसाठी मतदान पार पडत असल्याने नाराजी देखील व्यक्त केली आहे.























