Marathi actress : मराठी अभिनेत्रीचं लठ्ठपणावरुन ट्रोलिंग, थेट मुंबई पोलिसांनाच केलं पोस्टमध्ये टॅग; नेमकं प्रकरण काय?
Marathi actress : मराठी अभिनेत्रीला बॉडी शेमिंगच्या प्रकारला सामोरे जावे लागले असल्याची घटना घडली. त्यानंतर अभिनेत्रीने पोस्ट करत मुंबई पोलिसांनाच टॅग केलं आहे.
Marathi actress : अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) ही कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत तिने साकारलेली लतिका ही प्रेक्षकांना फारच भावली. त्याचप्रमाणे या मालिकेचा सुरुवातीचा विषयही फार वेगळा होता. बऱ्याचदा अभिनेत्रींना त्यांच्या शरीरावरुन ट्रोल केलं जातं. असाच आशय घेत एका साध्या सरळ मुलीची गोष्ट या मालिकेतून साकारली होती.
दरम्यान या मालिकेची गोष्ट अक्षय्याने खऱ्या आयुष्यातही अनुभवल्याचं तिने अनेकदा सांगितलं आहे. त्यातच अभिनेत्री म्हणूनही अक्षय्याला बऱ्याच प्रमाणात बॉडी शेमिंग या प्रकाराला सामोरं जावं लागलं आहे. पण नुकतच सोशल मीडियावर अक्षय्याला एक विचित्र अनुभव आला. तो अनुभव तिने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. त्याचप्रमाणे तिने या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांना देखील टॅग केलंय.
अक्षय्याची पोस्ट नेमकी काय?
अक्षयाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, “मी खूप भाग्यवान आहे की मी सोशल मीडियावर बॉडी शेमिंग / ट्रोलिंगचा सामना केला नाही. कधीतरी, होय नक्कीच; पण मी अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यांना इतकं महत्त्व द्यावं असं कधी वाटलं नव्हतं. पण यावेळी मला त्या व्यक्तीला बोलावेसे वाटते कारण टिपण्या / बॉडी शेमिंगमध्ये माझ्या कुटुंबातील सदस्यांचाही उल्लेख आहे. आणि हे मी सहन करू शकत नाही.”
पुढे तिने म्हटलं तसंच, ही व्यक्ती इतकी रिकामटेकडी आहे की ते २०१९मध्ये अपलोड केलेल्या पोस्ट खोदून कमेंट करत आहेत. आणि त्या अकाउंटवर त्यांचे कोणतेही फॉलोअर्स किंवा पोस्ट नाहीत. हे हेट अकाउंट खास माझ्यासाठी बनवलं आहे, असं दिसतं…बरं हे त्यांचं अकाउंट आहे. जमल्यास रिपोर्ट/ स्पॅम / रिपोर्ट ब्लॉक करा. @vikashsagwan208 पुढे त्यांच्या कमेंटचे स्क्रीनशॉट अपलोड करत आहे.' अक्षयाने तिच्या या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांना टॅग करत अशा प्रकारच्या लोकांवर कारवाईची देखील मागणी केली असल्याचं पाहायला मिळतंय.
ही बातमी वाचा :
मैत्रिणींच्या जगात भारी यारीचा 'पिंगा गं पोरी पिंगा'; बिग बॉसनंतर कलर्सवर नवी मालिका