Kangana Ranaut : कंगना रनौत खार पोलीस ठाण्यात हजर; तब्बल दीड तास जबाब नोंदवला
Kangana Ranaut : जबाब नोंदवण्यासाठी कंगना खार पोलीस ठाण्यात आज हजर झाली.
Kangana Ranaut : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट नेटकऱ्यांचे नेहमी लक्ष वेधतात. काही दिवसांपूर्वी कंगनानं दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केली होती. ही टीका करताना तिने या आंदोलनाचा संबंध एका फुटीरतावादी संघटनेशी असल्याचे सांगितले. त्यानंतर शीख संघटनांनी मागील महिन्यात खार पोलीस ठाण्यात कंगना रनौत विरोधात तक्रार दाखल केली होती. याच संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी कंगनाने खार पोलीस ठाण्यात आज हजेरी लावली. कंगनाने तब्बल दीड तास जबाब नोंदवला.
काय आहे प्रकरण?
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन आहे, असं कंगनाने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनात पंजाबमधील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. कंगनाच्या या टिप्पणीनंतर शीख संघटनांकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. कंगनाच्या या टिप्पणीनंतर शीख संघटनांकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
शीख संघटनेने केलेल्या तक्रारीवर खार पोलिसांनी कंगनाविरोधात एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरविरोधात कंगनाने या हायकोर्टात धाव घेतली होती. पोलिसांनी कंगनाविरोधात 25 जानेवारी 2022 पर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे म्हटले होते.
पंजाबमध्ये जमावाने कंगनाला घेरले होते
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे म्हटले त्यामुळे तिला पंजाबमध्ये जमावाने घेरले. याबद्दल कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे,"मी पंजाबमध्ये प्रवेश करत असताना एका जमावाने माझ्या कारवर हल्ला केला. ते शेतकरी असल्याचे सांगत आहेत".
हे ही वाचा :
Bollywood Actress : आलिया, प्रियांका अन् कतरिना... एका चित्रपटासाठी एवढे मानधन घेतात 'या' अभिनेत्री
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha