Kamal Haasan : कमल हासनने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट; 'Thug Life'चा टीझर आऊट! 36 वर्षांनी मणिरत्नमसोबत करणार काम
Kamal Haasan : कमल हासन यांच्या 'Thug Life' या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.
Kamal Haasan : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवशी त्यांनी चाहत्यांना खास भेट दिली आहे. कमल हासनच्या 'ठग लाईफ' (Thug Life) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'नायकन' या सिनेमानंतर तब्बल 36 वर्षांनी 'ठग लाईफ' या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासन आणि मणिरत्नम (Mani Ratnam) एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या सिनेमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे.
कमल हासन यांनी आपल्या वाढदिवशी चाहत्यांना अनोखी भेट दिली आहे. अभिनेत्याने आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. कमल हासनच्या आगामी सिनेमाचं नाव 'ठग लाईफ' आहे. या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासन आणि मणिरत्नम 36 वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. याआधी 1987 मध्ये आलेल्या 'नायकन' या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं होतं.
कमल हासन यांनी शेअर केलं 'ठग लाईफ'चं पोस्टर (Kamal Haasan Shared Thug Life Poster)
कमल हासन यांनी 'ठग लाईफ' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल आण मद्रास टॉकिज या सिनेमाची निर्मिती करत आहेत. या सिनेमात कमल हासनसह जयम रवी, तृषा, दुलकर सलमान, अभिरामी आणि नासिर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
View this post on Instagram
'थग लाईफ'चा टीझर आऊट! (Thug Life Teaser Out)
'ठग लाईफ' या सिनेमाचं नाव आधी 'KH 234' होतं. पण नंतर या सिनेमाचं नाव बदलण्यात आलं. टीझरच्या सुरुवातीलाच मणिरत्नम आणि ए आर रहमान यांचं नाव झळकत आहे. त्यानंतर एका मैदानात कमल हासन उभे असलेले दिसत आहेत. हातावर पट्टी, लांबलचक केस, भेधडक नजर असा काहीसा कमल हासन यांचा लूक पाहायला मिळत आहे. त्यानंतर कमल हासनच्या अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे.
कमल हासनच्या 'ठग लाईफ' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मणिरत्नम यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. टीझर आणि पोस्टर आऊट झाल्याने प्रेक्षकांची या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. गँगस्टार अॅक्शन पॅक्ड ड्रामा पाहायला तुम्हाला आवडत असेल तर हा सिनेमा नक्की पाहा. मणिरत्नम आणि कमल हासन दोघांकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. हा पॅन इंडिया सिनेमा असून हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या