June 2023 Release : शाहरुख खान ते प्रभास; जून महिन्यात रिलीज होणार सेलिब्रिटींचे चित्रपट
Movies : शाहरुख खानच्या 'जवान'पासून ते प्रभासच्या 'आदिपुरुष'पर्यंत अनेक बिग बजेट सिनेमे जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

June 2023 Movies Release : हिंदी सिनेसृष्टीला (Bollywood) सध्या सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या धाटणीचे अनेक चांगले सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. येत्या जून महिन्यातदेखील (June) अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे सिनेप्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान'पासून (Jawan) ते प्रभासच्या (Prabhas) 'आदिपुरुष'पर्यंत (Adipurush) अनेक बिग बजेट सिनेमे जून महिन्यात प्रदर्शित होणार आहेत.
सिनेमाचं नाव : जवान (Jawan)
कधी प्रदर्शित होणार? 2 जून 2023
'पठाण' (Pathaan) सिनेमानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आता 'जवान' (Jawan) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2 जून 2023 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीने केलं आहे.
View this post on Instagram
सिनेमाचं नाव : आदिपुरुष (Adipurush)
कधी प्रदर्शित होणार? 16 जून 2023
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) बहुचर्चित 'आदिपुरुष' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असून अखेर आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 16 जूनला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आधी हा सिनेमा 12 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. या सिनेमात प्रभाससह कृती सेननदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
सिनेमाचं नाव : मैदान (Maidaan)
कधी प्रदर्शित होणार? 23 जून 2023
अजय देवगन सध्या 'भोला' या सिनेमामुळे चर्चेत आहे. येत्या शुक्रवारी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अनेक दिवसांनी अजय रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमानंतर लगेचच अजयचा 'मैदान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 23 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
सिनेमाचं नाव : सत्य प्रेम की कथा (Satya Prem Ki Katha)
कधी प्रदर्शित होणार? 29 जून 2023
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) गेल्या काही दिवसांपासून 'सत्य प्रेम की कथा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 29 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कार्तिकसोबत कियारा आडवाणीदेखील झळकणार आहे. या सिनेमाची कार्तिक-कियाराचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या
Movie Release This Week : अजयचा 'भोला' ते नानीचा 'दसरा'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
