Jr NTR: वृंदावनम ते जनता गॅरेज; साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचे 'हे' 10 चित्रपट नक्की पाहा
ज्युनियर एनटीआर (Jr NTR) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. जाणून घेऊयात ज्युनियर एनटीआरचे IMDb वरील टॉप-10 चित्रपट...
Jr NTR: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरचा (Jr NTR) 20 मे रोजी 40 वा वाढदिवस आहे. ज्युनियर एनटीआर हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. अनेक हिट चित्रपटांमध्ये ज्युनियर एनटीआरनं काम केलं आहे. जाणून घेऊयात ज्युनियर एनटीआरचे IMDb वरील टॉप-10 चित्रपट...
IMDb वरील ज्युनियर एनटीआरचे टॉप-10 चित्रपट:
1. RRR - 7.8
2. रामायणम - 7.7
3. टू फादर विथ लव्ह (नान्नाकू प्रेमाथो) - 7.5
4. टेम्पर - 7.4
5. अरविंद समेथा - 7.3
6. सिंहाद्री (Simhadri)- 7.3
7. आदी (Aadi) - 7.3
8. जनता गॅरेज (Janatha Garage) - 7.2
9. थिफ ऑफ यमा (Thief of Yama )- 7.2
10. वृंदावनम - 7.1
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्रह्मर्षी विश्वामित्र आणि 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या रामायणम या चित्रपटांमध्ये ज्युनियर एनटीआरनं बालकलाकार म्हणून काम केलं आहे. 2001 मध्ये ज्युनियर एनटीआरने 'स्टुडंट नंबर 1' मधून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. RRR या चित्रपटामुळे ज्युनियर एनटीआरला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यानं ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब हे पुरस्कार पटकावले आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. RRR चित्रपटात ज्युनिअर एनटीआरसोबतच राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
2011 मध्ये लक्ष्मी प्राणथीसोबत लग्नगाठ बांधली. लक्ष्मी आणि ज्युनियर एनटीआर यांना दोन मुलं आहेत. ज्युनियर एनटीआर हा त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो.
View this post on Instagram
ज्युनियर एनटीआरचा चाहता वर्ग मोठा आहे. ज्युनियर एनटीआर हा त्याच्या आगामी चित्रपटांची माहिती सोशल मीडियावरच्या माध्यमातून देत असतो. त्याला इन्स्टाग्रामवर 6.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. तर ट्विटरवर त्याला 6.9 मिलियन एवढे फॉलोवर्स आहेत.
ज्युनियर एनटीआरचे आगामी चित्रपट
ज्युनियर एनटीआरचा 'एनटीआर 30' (NTR 3O) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबतच अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 'एनटीआर 30' ही हाय व्होल्टेज अॅक्शन ड्रामा फिल्म असणार आहे. ज्युनियर एनटीआरच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: