एक्स्प्लोर

Happy Birthday Jr NTR : लठ्ठ आणि दिसण्यावरुन कुरूप म्हणून अवहेलना, पण राजामौलीने आयुष्य बदललं; ज्यूनिअर एनटीआर आज 450 कोटींचा मालक

Jr NTR Birthday : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. ज्युनिअर एनटीआर आज इंडस्ट्रीतला सुपरस्टार असला तरी एकेकाळी त्याला लठ्ठपणामुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागत होता.

Jr NTR : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) आजच्या घडीला चांगलाच लोकप्रिय आहे. फक्त साऊथच नव्हे तर जगभरात तो चांगलाच लोकप्रिय आहे. ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव नंदमुरी तारक रामा राव ज्युनिअर असं आहे. अभिनेता आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. ज्युनिअर एनटीआरचा जन्म 20 मे 1983 रोजी हैदराबादमध्ये झाला. ज्युनिअर एनटीआरचा जन्म एका रॉयल घराण्यात झाला असला तरी सिनेसृष्टीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला आहे. आयुष्यात एकेकाळी त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. 

ज्युनिअर एनटीआर हा तेलुगू स्टार आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन टी रावा राव यांचा तो नातू आहे. अभिनेत्याला चाहते प्रेमाणे तारक  म्हणतात. ज्युनिअर एनटीआरने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या 8 व्या वर्षी केली आहे. बालकलाकार म्हणून 1991 मध्ये आलेल्या 'ब्रह्मऋषी विश्वमित्र' या चित्रपटाच्या माध्यमातचून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तारकने राज भरतची भूमिका साकारली होती. पुढे वयाच्या 14 व्या वर्षी तो श्रीरामाच्या भूमिकेत झळकला. 1997 मध्ये त्याने 'रामायणम्' या चित्रपटात काम केलं. या चित्रपटातील कामासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ज्युनिअर एनटीआरला वयाच्या 18 व्या वर्षी 2001 मध्ये 'निन्नु चूडालानी' या चित्रपटाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पहिला ब्रेक मिळाला. 

लठ्ठ आणि दिसण्यावरुन कुरूप म्हणून अवहेलना

ज्युनिअर एनटीआरने सिनेसृष्टीत करिअर करायला सुरुवात केली तेव्हा लठ्ठपणा आणि दिसण्यावरुन कुरुप म्हणून त्याची अवहेलना करण्यात आली. त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 'राखी' या 2006 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटासाठी त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं. त्यावेळी त्याचं वजन 100 किलो होतं. पुढे 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'लोक परलोक' चित्रपटासाठी त्याने 20 किलो वजन कमी केलं. 

राजामौलीने दिला पहिला हिट

ज्युनिअर एनटीआरला पहिला हिट चित्रपट देणारा दुसरा-तिसरा कोणी नसून राजामौली आहे. दोघांनी 2001 मध्ये पहिला एकत्र चित्रपट केला. 'स्टूडंट नंबर 1' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. राजामौलीने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. पुढे आणखी तीन चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं. यात 'मिम्हाद्री','लोक-परलोक' आणि 'RRR' या तीन चित्रपटांचा समावेश आहे. 2002 मध्ये रिलीज झालेल्या 'आदि' आणि 'सिम्हाद्री' या चित्रपटाच्या यशाने ज्युनिअर एनटीआर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. 

ज्युनिअर एनटीआर कोट्यवधींचा मालक

ज्युनिअर एनटीआरची एकूण संपत्ती 450 कोटी रुपयांच्या आसपास आहे. अभिनेत्याचं हैदराबादमध्ये आलिशान घर आहे. या घराची किंमत 25 कोटी रुपये आहे. तसेच हैदराबादमध्ये एक फार्महाऊस, मुंबई आणि बंगळुरूमध्ये एक घर आहे. ज्युनिअर एनटीआरला गाड्यांचीदेखील प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. ज्युनिअर एनटीआर एका चित्रपटासाठी 50-60 कोटी रुपयांचं मानधन घेतो. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये ज्युनिअर एनटीआरचा समावेश होतो. 

ज्युनिअरचा 'देवरा' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Jr NTR Upcoming Movie) 

ज्युनिअर एनटीआरचा 'देवरा' (Devra) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणर आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर पहिल्यांदाच अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आता या चित्रपटाची प्रतीक्षा आहे.

संबंधित बातम्या

Lok Sabha Election 2024 : गुलजार, धर्मेंद्र, हेमा मालिनी ते आशा भोसले, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget