एक्स्प्लोर
बर्थ डे स्पेशल: सातवी शिकलेला जॉनी लिव्हर कसा झाला कॉमेडीचा बादशाह?
बॉलिवूडमधील खराखुरा कॉमेडीयन म्हणून ज्यांची ओळख आहे, ते म्हणजे जॉनी लिव्हर. विनोदाचा बादशाह असलेले जॉनी लिव्हर आज वयाची 60 वर्षे पूर्ण करत आहे.

मुंबई: बॉलिवूडमधील खराखुरा कॉमेडीयन म्हणून ज्यांची ओळख आहे, ते म्हणजे जॉनी लिव्हर. विनोदाचा बादशाह असलेले जॉनी लिव्हर आज वयाची 60 वर्षे पूर्ण करत आहे. 14 ऑगस्ट 1957 रोजी जन्मलेले जॉनी लिव्हर मिमिग्रीचा शहनशाह म्हणून ओळखले जातात.
निखळ विनोदांनी प्रेक्षकांना ‘पॉझिटिव्ह एनर्जी’देणारा जॉनी लिव्हर प्रत्येकाला आपलासा वाटतो. प्रेक्षकांना रडवणं सोपं आहे मात्र त्यांना हसवणं कठीण काम आहे. पण हे कठीण काम चुटकीसरशी करण्याचा हातखंडा जॉनी लिव्हरकडे आहे. जर बॉलिवूडच्या विनोदी कलाकारांची यादी बनवायची झाली, तर जॉनी लिव्हरच्या नावाशिवाय ती अपूर्ण असेल. फिल्मी सफर, सनील दत्त यांचा शोध अन्य कलाकारांप्रमाणेच जॉनी लिव्हर यांनीही त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागला. मिमिक्री हे अस्त्र असलेला विनोदाचा हा हिरा शोधला तो सुनील दत्त यांनी.
एका स्टेज शोदरम्यान जॉनी लिव्हरच्या मिमिक्री स्टाईलने अभिनेते सुनील दत्त यांना प्रभावित केलं. त्यांनीच जॉनी लिव्हर यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळवून दिला. सिनिअर्सची मिमिक्री जॉनी लिव्हर यांचा जन्म तेलुगू ख्रिश्चन कुटुंबात झाला. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ते हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडमध्ये नोकरी करत होते. कंपनीत काही सिनिअर्सची मिमिक्री करुन सहकाऱ्यांना पोटात दुखेपर्यंत हसवण्याचं काम जॉनी अधून-मधून करत होते.
सातवीपर्यंत शिक्षण जॉनी लिव्हर यांचं शिक्षण केवळ सातवीपर्यंतच झालं. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून काम करावं लागलं. लहानपणापासूनच त्यांनी छोटी-मोठी कामं करुन, कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. शिक्षण नसलं म्हणून काय झालं, त्यांनी आपल्या कला गुणांनी जगाला दखल घ्यायला भाग पाडलं. जॉनी लिव्हर यांना पहिल्यांदा 1982 मध्ये ‘दर्द का रिश्ता’ या सिनेमात काम मिळालं. मात्र या सिनेमात ते प्रकाशझोतात आले नाहीत. पण जॉनी लिव्हर यांच्या कामाची दखल बॉलिवूडकर यांनी घेतली होती. 1993 मध्ये आलेल्या शाहरुखच्या या सिनेमानंतर जॉनी लिव्हरने मागे वळून पाहिलंच नाही. विनोदी भूमिकेसाठी एकमेव पर्याय म्हणून जॉनी लिव्हरकडे पाहिलं गेलं. जॉनी लिव्हरच्या कुंवारा, करण अर्जुन, कोयला, यस बॉस, आंटी नंबर 1, दुल्हे राजा, हॅलो ब्रदर, मेला, कहो ना प्यार है, राजा हिंदुस्थानी, फिर हेरा फेरी, रेस, हाऊसफुल्ल 2, दिलवाले, ‘मै खिलाडी तू अनाडी’, इश्क असे तीनशेपेक्षा अधिक सिनेमे जॉनी लिव्हरने गाजवले आहेत. पाहा जॉनी लिव्हर यांचे काही कॉमेडी सिन्स
निखळ विनोदांनी प्रेक्षकांना ‘पॉझिटिव्ह एनर्जी’देणारा जॉनी लिव्हर प्रत्येकाला आपलासा वाटतो. प्रेक्षकांना रडवणं सोपं आहे मात्र त्यांना हसवणं कठीण काम आहे. पण हे कठीण काम चुटकीसरशी करण्याचा हातखंडा जॉनी लिव्हरकडे आहे. जर बॉलिवूडच्या विनोदी कलाकारांची यादी बनवायची झाली, तर जॉनी लिव्हरच्या नावाशिवाय ती अपूर्ण असेल. फिल्मी सफर, सनील दत्त यांचा शोध अन्य कलाकारांप्रमाणेच जॉनी लिव्हर यांनीही त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागला. मिमिक्री हे अस्त्र असलेला विनोदाचा हा हिरा शोधला तो सुनील दत्त यांनी.
एका स्टेज शोदरम्यान जॉनी लिव्हरच्या मिमिक्री स्टाईलने अभिनेते सुनील दत्त यांना प्रभावित केलं. त्यांनीच जॉनी लिव्हर यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळवून दिला. सिनिअर्सची मिमिक्री जॉनी लिव्हर यांचा जन्म तेलुगू ख्रिश्चन कुटुंबात झाला. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ते हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडमध्ये नोकरी करत होते. कंपनीत काही सिनिअर्सची मिमिक्री करुन सहकाऱ्यांना पोटात दुखेपर्यंत हसवण्याचं काम जॉनी अधून-मधून करत होते.
सातवीपर्यंत शिक्षण जॉनी लिव्हर यांचं शिक्षण केवळ सातवीपर्यंतच झालं. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून काम करावं लागलं. लहानपणापासूनच त्यांनी छोटी-मोठी कामं करुन, कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. शिक्षण नसलं म्हणून काय झालं, त्यांनी आपल्या कला गुणांनी जगाला दखल घ्यायला भाग पाडलं. जॉनी लिव्हर यांना पहिल्यांदा 1982 मध्ये ‘दर्द का रिश्ता’ या सिनेमात काम मिळालं. मात्र या सिनेमात ते प्रकाशझोतात आले नाहीत. पण जॉनी लिव्हर यांच्या कामाची दखल बॉलिवूडकर यांनी घेतली होती. 1993 मध्ये आलेल्या शाहरुखच्या या सिनेमानंतर जॉनी लिव्हरने मागे वळून पाहिलंच नाही. विनोदी भूमिकेसाठी एकमेव पर्याय म्हणून जॉनी लिव्हरकडे पाहिलं गेलं. जॉनी लिव्हरच्या कुंवारा, करण अर्जुन, कोयला, यस बॉस, आंटी नंबर 1, दुल्हे राजा, हॅलो ब्रदर, मेला, कहो ना प्यार है, राजा हिंदुस्थानी, फिर हेरा फेरी, रेस, हाऊसफुल्ल 2, दिलवाले, ‘मै खिलाडी तू अनाडी’, इश्क असे तीनशेपेक्षा अधिक सिनेमे जॉनी लिव्हरने गाजवले आहेत. पाहा जॉनी लिव्हर यांचे काही कॉमेडी सिन्स आणखी वाचा