एक्स्प्लोर

WWE सुपरस्टार जॉन सीना अन् रणदीप हुडा एकत्र, हॉलिवूड ॲक्शन-थ्रीलर 'मॅचबॉक्स'मध्ये झळकणार

Randeep Hooda and John Cena In Matchbox : अभिनेता रणदीप हुडा जॉन सीनासोबत आगामी ॲक्शन थ्रिलर 'मॅचबॉक्स' चित्रपटामध्ये मोठ्या पडद्यावर परतण्यास सज्ज झाला आहे.

Randeep Hooda and John Cena : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हॉलिवूड चित्रपटामध्ये झळकण्यास सज्ज झाला आहे. अभिनेता रणदीप हुड्डा WWE सुपरस्टार आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीनासोबत एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. या दोन स्टार्सना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. सॅम हार्ग्रेव्ह दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट मॅचबॉक्स चित्रपटामध्ये जॉन सीना आणि रणदीप हुडा एकत्र काम करणार आहेत. अभिनेता रणदीप हुडा दिग्दर्शक सॅम हारग्रेव्हसोबत आगामी ॲक्शन थ्रिलर 'मॅचबॉक्स' चित्रपटामध्ये मोठ्या पडद्यावर परतण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन सीना देखील असणार आहे. 

WWE सुपरस्टार जॉन सीना अन् रणदीप हुडा एकत्र

2020 मध्ये आलेल्या नेटफ्लिक्स ब्लॉकबस्टर हॉलिवूड चित्रपटा 'एक्सट्रॅक्शन' (Extraction) मध्ये रणदीप हुड्डाने दिग्दर्शक हार्ग्रेव्हसोबत काम केलं होतं. यामधील त्याची साजूची त्याची भूमिका मोठ्या प्रमाणात गाजली होती. सुपरहिट नेटफ्लिक्स चित्रपट 'एक्सट्रॅक्शन'च्या यशानंतर रणदीपचा दिग्दर्शकासोबतचा हा दुसरा हॉलिवूड चित्रपट असेल. मॅटेलच्या लोकप्रिय 'मॅचबॉक्स' खेळण्यांच्या वाहनांपासून प्रेरित असलेल्या या लाईव्ह-अ‍ॅक्शन चित्रपटात रणदीप हुड्डा आणि जॉन सीना यांच्यासोबतच हॉलिवूड स्टार टियोना पॅरिस, जेसिका बीएल आणि सॅम रिचर्डसन देखील दिसणार आहेत. व्हरायटीच्या रिपोर्टनुसार, सध्या बुडापेस्टमध्ये या चित्रपटाचं प्रोडक्शन सुरू आहे.

ॲक्शन-थ्रीलर 'मॅचबॉक्स'मध्ये झळकणार

'अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम' आणि 'एक्सट्रॅक्शन 2' चे दिग्दर्शक हारग्रेव्ह यांच्यावर मॅचबॉक्स चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आहे. स्कायडान्सचे डेव्हिड एलिसन आणि डाना गोल्डबर्ग, मॅटेल फिल्म्सचे डॉन ग्रेंजर आणि रॉबी ब्रेनर यांच्यासह याची निर्मिती करत आहेत. डेव्हिड कॉगेशॉल आणि जोनाथन ट्रॉपर यांनी याची कथा लिहिली आहे. 'मॅचबॉक्स' ही बालपणीच्या मित्रांची कहाणी आहे. हे मित्र जागतिक आपत्ती रोखण्यासाठी काम करताना पुन्हा एकत्र येतात. हा चित्रपट 1953 मध्ये सुरू झालेल्या आयकॉनिक मॅचबॉक्स कार लाइनवर आधारित आहे, जेव्हा जॅक ओडेलने त्यांच्या मुलीसाठी एक खेळणी तयार केली होती, जी मॅचबॉक्समध्ये बसेल इतकी लहान होती. 

रणदीप हुडाचा दुसरा हॉलिवूड चित्रपट

रणदीप हुडाने हार्ग्रेव्हसोबत पुन्हा काम करण्याबद्दलच्या प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "मी सॅमसोबत पुन्हा काम करण्यास उत्सुक आहे. एक्सट्रॅक्शनवेळी आमच्या पहिल्या प्रोजेक्टमध्येही आम्हाला खूप मजा आली होती. सॅम हा उच्च दर्जाच्या स्टोरीटेलिंग आणि अॅक्शनचा मास्टर आहे. या चित्रपटाच्या टीममध्ये सामील झाल्याचा आनंद आहे."

रणदीप हुडा 'या' चित्रपटांमध्ये झळकणार

दरम्यान, अभिनेता रणदीप हुडाकडे अनेक रोमांचक आणि दमदार प्रोजेक्ट आहेत. रणदीप हुडा 2024 मध्ये 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटात झळकला होता, त्यानेच या चित्रपटाचं केलं आहे. सध्या रणदीप सनी देओलसोबत कोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित 'जाट' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय, तो विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'अर्जुन उस्तारा' या चित्रपटातही झळकणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget