Jersey New Trailer : शाहिद कपूरच्या 'जर्सी' सिनेमाचा नवा ट्रेलर प्रदर्शित
Jersey : शाहिद कपूरच्या आगामी 'जर्सी' सिनेमा 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Jersey New Trailer : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या बहुप्रतिक्षित 'जर्सी' (Jersey) सिनेमाचा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा ट्रेलर झी म्युझिक कंपनीने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.
'जर्सी' सिनेमाच्या नव्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूरचे क्रिकेटवेड दिसत आहे. तसेच शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुर रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. शाहिद कपूरच्या क्रिकेटसाठीच्या संघर्षावर सिनेमा भाष्य करणारा आहे.
View this post on Instagram
शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर 'जर्सी' सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. जर्सी हा सुपरहिट सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. 'जर्सी' सिनेमात मृणाल ठाकूर शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केले आहे. शाहिद आणि मृणाल पहिल्यांदाच या सिनेमात एकत्र दिसणार आहेत.
संबंधित बातम्या
Good News : गुरमित-देबिना बनले आई-बाबा! सोशल मीडियावर शेअर केली आनंदाची बातमी!
Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात व्लादिमीर झेलेन्स्की यांचा खास संदेश; म्हणाले, 'भयानक शांततेचं रूपांतर संगीतात करा'
Happy Birthday Pallavi Joshi : बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात, आता मोठा पडदा गाजवतेय पल्लवी जोशी!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)