Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात व्लादिमीर झेलेन्स्की यांचा खास संदेश; म्हणाले, 'भयानक शांततेचं रूपांतर संगीतात करा'
ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards)सोहळ्यामध्ये युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी (Volodymyr Zelenskyy) व्हिडीओ कॉलद्वारे खास मेसेज दिला.
Grammy Awards 2022 : युक्रेन आणि रशियामधील (Russia-Ukraine War) युद्ध 40 व्या दिवशीही सुरुच आहे. नुकताच 64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा (Grammy Awards) लास वेगसमधील एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी (Volodymyr Zelenskyy) व्हिडीओ कॉलद्वारे खास मेसेज दिला. या मेसेजमध्ये झेलेन्स्की यांनी युक्रेनमधील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारासाठी त्यांनी रशियन नेत्यांना जबाबदार ठरवलं. ते पुढे म्हणाले की, ' माझी तुम्हाला विनंती आहे की या भयानक शांततेच रूपांतर संगीतीत करा.'
झेलेन्स्की म्हणाले, 'आमचे संगीतकार हे टक्सीडो (एक प्रकारचा सूट) घालण्याऐवजी बॉडी आर्मर (सैनिकांचा पोषाख) परिधान करत आहेत. ते हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमी लोकांसाठी गाणी गात आहेत. काही अशा लोकांसाठी देखील ते गाणी गात आहेत , जे कधीच ऐकू शकत नाहित. संगीताच्या विरूद्ध काय आहे? उध्वस्त शहरे आणि भयानक शांतता. आम्ही प्रेम करण्यासाठी, आवाज उठवण्यासाठी आणि जगण्यासाठी आमच्या स्वातंत्र्याचे रक्षण करत आहोत.'
झेलेन्स्की यांनी समर्थनासाठी केले आवाहन
झेलेन्स्की यांनी ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये लोकांना आवाहन केले. ते म्हणाले , 'आम्ही रशियाशी लढत आहोत. ते त्यांच्या बॉम्बमुळे इथे भयानक शांतता निर्माण करत आहे. या शांततेच रूपांतर संगीतामध्ये करा आणि आमची गोष्ट सर्वांना सांगा. सर्वांनी सोशल मीडियावरून आणि टिव्ही वरून युद्धाचे सत्य जगासमोर मांडा. कोणत्याही प्रकारे आम्हाला तुम्ही सपोर्ट करू शकता. पण शांत बसू नका. युद्धामुळे आमची अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. '
संबंधित बातम्या
- Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहता येणार
- Grammy 2022 : संगीतकार रिकी केजने जागवल्या भारतीयांच्या आशा, 'डिव्हाईन टाइड्स'साठी मिळालं नामांकन!
- Grammy Awards 2022 : थाटात पार पडला ग्रॅमी पुरस्कार सोहळा; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha