'या' फिल्मची पहिल्या दिवसाची कमाई 56 रुपये, रिलीजच्या 4 महिन्यांनी शोलेला पछाडलं, 70 च्या दशकात 5 कोटी कमावले
Blockbuster Movie Of 70s: 1975 मध्ये आलेल्या या चित्रपटानं सुरुवातीच्या दिवसांत 56, 100 रुपये कमावले, 'फ्लॉप फिल्म'चा टॅगही मिळाला, पण अचानक चमत्कार झाला अन् चित्रपट हाऊसफुल्ल होऊ लागला, 70 दशकात कमावले 5 कोटी
Film Earned 56 Rupees On First Day: अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर पुष्पा 2 (Pushpa 2: The Rule) सध्या बॉक्स ऑफिस (Box Office) गाजवत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 165 कोटी रुपयांची कमाई केली आणि आजवरच्या सर्वात मोठ्या ओपनरचा मान मिळवला. पण तुम्हाला माहितीय का? बॉक्स ऑफिसवर एक असा चित्रपट रिलीज झाला होता, ज्यानं रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त आणि फक्त 56 रुपये कमावले होते. धक्का बसला ना ऐकून? खरंच... एक असा चित्रपट होता, ज्यानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी फक्त 56 रुपयांती कमाई केली, पण त्यानंतर 4 महिन्यांतच असा काही चमत्कार झाला की, त्यानंतर या चित्रपटानं त्यावेळी टक्कर मध्ये असणाऱ्या ब्लॉकबस्टर शोलेसारख्या चित्रपटालाही पछाडलं आणि मागे टाकलं. तब्बल 50 आठवडे ही फिल्म थिएटरमध्ये चालली आणि 70 च्या दशकात 5 कोटींचा गल्ला जमवला होता.
हल्ली अनेक चित्रपट फार मोठ्या बजेटमध्ये तयार केले जातात. पण, सर्वच चित्रपट बक्कळ कमाई करण्यात यशस्वी होतातच असं नाही. अनेक तर आपलं बजेटही वसूल करत नाहीत. यापूर्वी म्हणजे, अगदी 70, 80 च्या दशकातही अनेक बिग बजेट सिनेमे रिलीज करण्यात आले. काहींनी छप्पडफाड कमाई केली, तर काहींना काही दिवसांतच गाशा गुंडाळावा लागला. काही फारच कमी बजेटमध्ये बनवले जातात, पण जोरदार चालतात. मंजुम्मल बॉईज, प्रेमालू यांसारख्या मुंज्या आणि मल्याळम चित्रपटांद्वारे आपण सर्वांनीच हे पाहिलं. 70 च्या दशकात असाच एक चित्रपट बॉलिवूडमध्ये रिलीज झाला होता. त्या काळात 30 लाखांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवला होता, ज्यानं थेट ब्लॉकबस्टर शोला सारख्या चित्रपटाला टक्क दिली होती. पण, या चित्रपटाचा एक रंजक किस्सा आहे, तुम्ही ऐकलाय का तो?
थेट शोलेला दिलेली टक्कर
48 वर्षांपूर्वी 30 मे 2024 रोजी 'जय संतोषी माँ' (Jai Santoshi Maa) नावाचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. 1975 मध्ये यानं बजेटपेक्षा कितीतरी पटींनी जास्ट अगदी कोट्यवधींची कमाई केली होती. पहिल्या दिवशी या चित्रपटानं मुंबईत 56 रुपये तर तिसऱ्या दिवशी 100 रुपये कमावले होते. त्यावेळी बिझनेस ॲनालिस्टनं या चित्रपटाला 'फ्लॉप फिल्म' म्हणून टॅग दिला होता. पण शेवटी, लोकांकडून मिळालेल् माऊथ टू माऊथ प्रसिद्धीमुळे चित्रपटगृहांकडे अधिक प्रेक्षक आकर्षित होण्यास मदत झाली आणि अचानक चमत्कार घडला. ज्यान पहिल्या दिवशी 56 आणि दुसऱ्या दिवशी 100 रुपयांची कमाई केलेली, त्या चित्रपटानं तब्बल 50 आठवडे गाजवले आणि तब्बल 5 कोटींची कमाई केली.
बॉक्स ऑफिसवर 5 कोटींची कमाई
जय संतोषी माँ चित्रपटाचं दिग्दर्शन विजय शर्मा यांनी केलं होतं आणि त्यात कानन कौशल, अनिता गुहा, रजनी बाला यांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 5 कोटींची कमाई केली होती. मात्र, चित्रपट निर्मात्यांना त्याच्या कमाईत कोणताही फायदा झाला नाही. कारण डिस्ट्रिब्यूटर्सना चित्रपट घेण्याबाबत शंका होती. शेवटी केदारनाथ अग्रवाल आणि संदीप सेठी यांनी हा चित्रपट डिस्ट्रिब्यूट करण्याचा निर्णय घेतला. पण चित्रपटाचे निर्माते सतराम रोहरा यांनी स्वत:ला दिवाळखोर घोषित केलं, कारण त्यांना चित्रपटाच्या यशातून एक रुपयाही मिळाला नाही.
इंडियाकॉमच्या अहवालानुसार, केदारनाथ यांच्या भावानं कथितपणे फसवणूक केली आणि सर्व कमाई हडप केली. त्यामुळे सतराम आणि केदारनाथला नुकसान सहन करावं लागलं. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि लोकांची उत्सुकता वाढू लागली, तेव्हा अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जया बच्चन आणि हेमा मालिनी अभिनीत शोले या चित्रपटाला टक्कर दिली. रमेश सिप्पी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 15 ऑगस्ट 1975 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :