एक्स्प्लोर

आयपीएलमध्ये बेटिंग केल्याची अरबाज खानची कबुली

आंतरराष्ट्रीय सामन्यांवर आपण आतापर्यंत सट्टा लावला असून बेटिंगमध्ये काही वेळा जिंकल्याचीही कबुली अभिनेता अरबाज खानने दिली

ठाणे : बॉलिवूड सुपस्टार सलमान खाननंतर त्याचा धाकटा भाऊही कायद्याच्या कचाट्यात अडकला. अभिनेता अरबाज खानने आयपीएलमधील सामन्यांवर सट्टेबाजी केल्याची कबुली दिली आहे. खान कुटुंबाला अरबाजच्या सवयीचा प्रचंड तिटकारा असल्याचीही माहिती आहे. गेल्या पाच वर्षांपासून अरबाज बुकी सोनू जलानच्या संपर्कात होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांवर आपण आतापर्यंत सट्टा लावला असून बेटिंगमध्ये काही वेळा जिंकल्याचीही कबुली अरबाजने दिली. मात्र आपल्या कुटुंबाला सट्टा लावणं पसंत नसल्याचंही अरबाज म्हणाला. आपण बेटिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र बुकी सोनू जलानने जुनी रेकॉर्डिंग्स ऐकवून ब्लॅकमेल केलं, दबाव आणला, असा दावा अरबाजने केला आहे. अरबाजवर दबाव आणून त्याचे पैसे सोनूने गुंतवल्यामुळे अरबाज थेट आरोपी होत नाही, त्यामुळे अरबाजला बेटिंग प्रकरणात पोलिसांनी मुख्य साक्षीदार केलं.

आयपीएल बेटिंग प्रकरणी अरबाज खानला समन्स

आयपीएल सामन्यांवरील बेटिंग प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाने अरबाजला समन्स बजावलं होतं. ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात झालेल्या चौकशीत अरबाजने ही कबुली दिली. चौकशीला जाण्यापूर्वी अरबाज खानने गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये जाऊन सलमानची भेट घेतली होती. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात अरबाजसोबत सलमानचा बॉडीगार्ड शेरा आणि वकील होते. ठाणे खंडणीविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी आयपीएल सामन्यांवर सुरु असलेलं ऑनलाईन बेटिंगचं रॅकेट उघड करत डोंबिवलीतून तिघांना अटक केली होती. त्यानंतर या तिघांच्या चौकशीत हे रॅकेट देशातला आघाडीचा बुकी सोनू जालान उर्फ सोनू मालाड चालवत असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी सोनूला बेड्या ठोकल्या. सोनूच्या चौकशीत अभिनेता अरबाज खान हा देखील सोनूकडे बेटिंग करत असल्याची माहिती समोर आली. यानंतर शुक्रवारी पोलिसांनी अरबाज खानला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. दरम्यान, सोनूच्या संपर्कात देशातले 80 ते 90 बडे बुकी आणि अनेक सेलिब्रेटी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लवकरच खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात बड्या असामींची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget