Kamal Haasan : कमल हासनच्या 'Indian 2'चा रिलीजआधीच धमाका; 200 कोटींमध्ये विकले ओटीटी राइट्स
Kamal Haasan : कमल हासन सध्या 'इंडियन 2' (Indian 2) या सिनेमामुळे चर्चेत आहेत.
![Kamal Haasan : कमल हासनच्या 'Indian 2'चा रिलीजआधीच धमाका; 200 कोटींमध्ये विकले ओटीटी राइट्स Indian 2 digital rights sold for a whopping Rs 200 crore know entertainment latest update Kamal Haasan : कमल हासनच्या 'Indian 2'चा रिलीजआधीच धमाका; 200 कोटींमध्ये विकले ओटीटी राइट्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/26/d491471935a00907ac80ea633766f7171690342126360254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kamal Haasan : अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) सध्या 'इंडियन 2' (Indian 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण रिलीजआधीच या सिनेमाचा जलवा पाहायला मिळाला आहे. रिलीजआधीच 200 कोटींमध्ये या सिनेमाचे ओटीटी राइट्स (OTT Rights) विकले गेले आहेत.
कमल हासनच्या 'इंडियन 2' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. एस. शंकर (S Shankar) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. त्यामुळे या सिनेमाची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. 'इंडियन 2' या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासन आणि एस. शंकर या जोडीने अनेक वर्षांनी एकत्र काम केले आहे. या सिनेमासाठी शंकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे.
'इंडियन 2'च्या ओटीटी राइट्सबद्दल जाणून घ्या...
कमल हासनचा 'विक्रम' (Vikram) हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. रेकॉर्डब्रेक कमाईसह या सिनेमातील कमल हासनच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. आता पुन्हा एकदा कमल हासन रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'इंडियन 2' या सिनेमाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने 200 कोटींमध्ये विकत घेतले आहेत.
View this post on Instagram
कमल हासनचा 'इंडियन 2' हा सिनेमा 1996 मध्ये आलेल्या 'इंडियन' या सिनेमाचा सीक्वेल आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. त्यामुळे या सिनेमाचे दिग्दर्शक एस. शंकर आता अमेरिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका स्टुडिओमधला फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं होतं,"इंडियन 2' या सिनेमासाठी अॅडव्हान्स तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत".
'इंडियन 2' या सिनेमात कमल हासनसह रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh), काजल अग्रवाल (Kajal Aggarwal), सिद्धार्थ, बॉबी सिम्हा आणि प्रिया भवानी शंकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'इंडियन' या सिनेमात कमल हासन सेनापती नामक एका स्वातंत्र्य सेनानीच्या भूमिकेत झळकले होते. भष्ट्राचाराविरोद्ध लढताना ते दिसले होते. आता चाहते 'इंडियन 2' सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या
Kamal Haasan : प्रभासच्या 'प्रोजेक्ट के'मध्ये कमल हासनची एन्ट्री! 150 कोटी रुपयांचं घेतलं मानधन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)