IMDb: 2023 मधील आतापर्यंतचे सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपट अन् वेब सीरिज; IMDb कडून यादी जाहीर
IMDb नं यावर्षातील आत्तापर्यंतच्या सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या 10 भारतीय चित्रपट आणि वेब सीरिजच्या यादीची घोषणा केली आहे.
![IMDb: 2023 मधील आतापर्यंतचे सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपट अन् वेब सीरिज; IMDb कडून यादी जाहीर IMDb Reveals list of the Most Popular Indian Movies and Web Series of 2023 IMDb: 2023 मधील आतापर्यंतचे सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपट अन् वेब सीरिज; IMDb कडून यादी जाहीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/5734a07dd70f162ec4987eab4231f0f31689237314958259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IMDb: 2023 हे वर्ष आर्धे संपले आहे. या सहा महिन्यांमध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. चित्रपट, टिव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील जगातील सर्वांत प्रसिद्ध माहितीचा स्रोत असलेल्या IMDb या साईटने जगभरातील IMDb युजर्ससाठी 2023 मधील आत्तापर्यंतच्या सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या 10 भारतीय चित्रपट आणि वेब सीरिजच्या यादीची घोषणा केली आहे. IMDb साईटवर दर महिन्याला येणा-या 20 कोटींहून अधिक विझिटर्सच्या पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb ने ही यादी बनवली आहे.
2023 मधील (आत्तापर्यंतचे) सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपट
पठाण
किसीका भाई किसी की जान
द केरला स्टोरी
तू झूठी मै मक्कार
मिशन मजनू
चोर निकल के भागा
ब्लडी डॅडी
सिर्फ एक बंदा काफी है
वारिसू
पोन्नियिन सेल्वन: पार्ट टू
View this post on Instagram
2023 मधील (आजपर्यंतच्या) सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सिरीज
फर्जी
द नाईट मॅनेजर
राणा नायडू
जुबिली
असूर: वेलकम टू यूवर डार्क साईड
दहाड
साँस, बहू और फ्लेमिंगो
ताज़ा खबर
ताज: डिव्हाईडेड बाय ब्लड
रॉकेट बॉयज
शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट या वर्षातला आजपर्यंतचा सर्वांत प्रसिद्ध चित्रपट ठरला आहे. याबाबत त्यानं सांगितलं, “IMDb च्या यादीमध्ये पठाण पहिल्या स्थानी आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. पठाणला मिळालेले इतके प्रेम पाहून आनंद होतो.'
फर्जी यामधील अभिनेता शाहिद कपूरनं सांगितलं , “फर्जीला मिळालेल्या अपार प्रेमामुळे आणि समर्थनामुळे ही वेब सीरिज IMDb च्या 2023 मधील सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सीरिजच्यायादीमध्ये पहिल्या स्थानी गेली आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. या शोसाठी अथक परिश्रम करणा-या आमच्या संपूर्ण टीमच्या उल्लेखनीय मेहनतीला मिळालेला हा बहुमान आहे.'
IMDb ने जाहीर केलेल्या या यादीमध्ये पठाण या चित्रपटाचं आणि फर्जी या वेब सीरिजचं नाव पहिल्या क्रमांकावर आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तर अभिनेता शाहिद कपूरच्या फर्जी या वेब सीरिजचं अनेकांनी कौतुक केलं. पठाण या चित्रपटात शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यासोबतच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तर फर्जी या वेब सीरिजमध्ये शाहिद कपूरसोबतच विजय सेतुपती केके मनन,अमोल पालेकर, राशी खन्ना या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
संंबंधित बातम्या
'या' आहेत भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध वेब सीरिज; IMDb नं टॉप-50 वेब सीरिजची यादी केली जाहीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)