एक्स्प्लोर
Advertisement
दिग्दर्शक राकेश रोशन यांना कॅन्सरचं निदान
ज्येष्ठ अभिनेते राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाल्याची माहिती पुत्र आणि अभिनेता हृतिक रोशनने दिली आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये पसरत चाललेलं जीवघेण्या आजारांचं लोण काही केल्या थांबताना दिसत नाही. प्रख्यात दिग्दर्शक आणि अभिनेते राकेश रोशन यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाल्याची माहिती पुत्र आणि अभिनेता हृतिक रोशनने दिली आहे. इन्स्टाग्रामवर भावपूर्ण पोस्ट टाकत हृतिकने वडिलांच्या आजारपणाविषयी माहिती दिली आहे.
'मी वडिलांना एक फोटो काढुयात का, असं विचारलं. सर्जरीच्या दिवशीही ते जिम करायला विसरणार नाहीत, याची मला खात्री होती. कारण माझ्या माहितीतले ते सर्वात कणखर व्यक्ती आहेत. काही आठवड्यांपूर्वी त्यांना घशाच्या स्क्वॅमस सेल कार्सिनोमाचं (कर्करोग) निदान झालं. पण या लढ्याला सामोरं जातानाही त्यांच्यात वेगळंच चैतन्य दिसतं. आम्हाला त्यांच्यासारखा कुटुंबप्रमुख लाभला, हे आमचं भाग्यच आहे.' असं लिहित हृतिकने वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे.
69 वर्षीय राकेश रोशन यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी 'घर घर की कहानी' चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर पराया धन, बुनियाद, कामचोर, खूबसूरत अशा अनेक चित्रपटांत काम केलं. दिग्दर्शक म्हणून त्यांनी खुदगर्ज, खून भरी मांग, करण अर्जुन, कोयला यासारखे चित्रपट दिले. 'कहो ना... प्यार है' चित्रपटातून त्यांनी हृतिकला लाँच केलं होतं. त्यानंतर कोई मिल गया, क्रिश, क्रिश 3 आणि काबिल यासारखे चित्रपट पिता-पुत्राच्या जोडीने दिले. विशेष म्हणजे राकेश रोशन यांची कन्या सुनैनाला काही वर्षांपूर्वी सर्विकल कॅन्सरचं निदान झालं होतं. मात्र तिने कर्करोगाला यशस्वी टक्कर दिली. त्यामुळे राकेश रोशनही कर्करोगाला यशस्वी फाईट देतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षात बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नफिसा जोसेफ यांना कर्करोगाचं निदान झालं, तर अभिनेता इरफान खानलाही न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement