एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?

Maharashtra Cabinet Expansion: शिवसेनेला कोणते 12 खाती मिळणार, याची यादी 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे.

Maharashtra Cabinet Expansion: राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल (16 डिसेंबर) नागपूरमधील (Nagpur) राजभवन येथे संपन्न झाला. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. यामध्ये शिवसेनेच्या 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 12 खाती येणार आहे. शिवसेनेला कोणते 12 खाती मिळणार, याची यादी 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे.

शिवसेनेला 12 खाती मिळणार-

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळणार आहे. तर गृहनिर्माण, उद्योग, पर्यटन ही महत्वाची खातीही शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत. तसेच आरोग्य, शालेय शिक्षण खातेही शिवसेनेकडेच कायम राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम(सा.उपक्रम वगळून ),पाणीपुरवठा खातंही शिवसेनेकडेच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. जल संधारण,मराठी भाषा,खणीकर्म,माजी सैनिक कल्याण खातीही शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सुरुवातीपासून गृहमंत्री खातं शिवसेनेच्या वाट्याला यावं, यासाठी आग्रही होते. परंतु गृह खातं भाजपकडेच राहणार आहे. गृह खात्याऐवजी नगर विकास आणि गृहनिर्माण शिवसेनेला देण्यात आले आहे.

नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...शिवसेना शिंदे गटाला पुढील खाती मिळणार-

नगरविकास,
गृहनिर्माण, 
उद्योग, 
पर्यटन,
आरोग्य, 
शालेय शिक्षण,
सार्वजनिक बांधकाम(सा.उपक्रम वगळून ),
पाणीपुरवठा,
जल संधारण,
मराठी भाषा,
खणीकर्म,
माजी सैनिक कल्याण

शिवसेनेकडून कोणाला मंत्रि‍पदासाठी संधी- (Shivsena Cabinet Minister List)

एकनाथ शिंदे
उदय सांमत
प्रताप सरनाईक
शंभूराज देसाई
योगश कदम
आशिष जैस्वाल
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
दादा भूसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट

आशिष जैस्वाल आणि योगेश कदम यांना राज्यमंत्री पद-

1. उदय सांमत- कॅबिनेट मंत्री 
2. प्रताप सरनाईक- कॅबिनेट मंत्री 
3. शंभूराज देसाई- कॅबिनेट मंत्री 
4. भरत गोगावले- कॅबिनेट मंत्री 
5. दादा भूसे- कॅबिनेट मंत्री 
6. प्रकाश आबिटकर- कॅबिनेट मंत्री
7. गुलाबराव पाटील- कॅबिनेट मंत्री  
8. संजय राठोड- कॅबिनेट मंत्री 
9. संजय शिरसाट - कॅबिनेट मंत्री 
10. योगश कदम- राज्यमंत्री 
11. आशिष जयस्वाल- राज्यमंत्री

पाच जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी

उदय सामंत, कोकण  
शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र
गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र
दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र 
संजय राठोड, विदर्भ 

नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान

प्रताप सरनाईक

भरत गोगावले

योगश कदम

प्रकाश आबिटकर

संजय शिरसाट

आशिष जैस्वाल

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या यादीतून छगन भुजबळांना डच्चू-

राष्ट्रवादीकडून नऊ मंत्र्यांची नावं जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या यादीत छगन भुजबळ यांना डच्चू देण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचंही नाव नव्हतं. मात्र ऐनवेळी धनंजय मुंडे यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.तसेच मंत्र्यांच्या यादीत दिलीप वळसे,धर्मराव अत्राम,अनिल पाटील यांनांही मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारले असता त्यांनी अजित पवार यांच्याकडे चेंडू टोलावला. तर अजित पवारांनीही उरलेल्या दोन नावांवर बोलण्यास नकार दिला. मंत्री ठरवायचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे, असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

संबंधित बातमी:

महायुतीचे मंत्री ठरले! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून मंत्रि‍पदासाठी कोणा कोणाला संधी; संपूर्ण यादी एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget