Shah Rukh Khan: शाहरुखला पाहताच हॉलिवूड अभिनेत्रीनं दिली अशी रिअॅक्शन; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
शाहरुखनं (Shah Rukh Khan) सौदी अरेबिया येथील रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये शाहरुखला सन्मानित करण्यात आलं.
![Shah Rukh Khan: शाहरुखला पाहताच हॉलिवूड अभिनेत्रीनं दिली अशी रिअॅक्शन; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल hollywood actress sharon stone screamed after seeing shah rukh khan see viral video Shah Rukh Khan: शाहरुखला पाहताच हॉलिवूड अभिनेत्रीनं दिली अशी रिअॅक्शन; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/2e2b4030bd9ccef04e4dcabe9e2829911670046437591259_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चाहता वर्ग मोठा आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातही शाहरुखचे चाहते आहेत. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. शाहरुखनं सौदी अरेबिया येथील रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये शाहरुखला सन्मानित करण्यात आलं. नुकताच या कार्यक्रमातील शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून व्हिडीओमधील एका हॉलिवूड अभिनेत्रीच्या रिअॅक्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
शाहरुखला पाहताच शेरोन स्टोननं दिली अशी रिअॅक्शन
रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमात हॉलिवूड अभिनेत्री शेरोन स्टोन ही देखील उपस्थित होती. शाहरुख खान जेव्हा सन्मान स्विकारण्यासाठी उभा राहिला तेव्हा शेरोन त्याला पाहून आनंदी झाली. शाहरुखला पाहिल्यानंतर शेरोननं दिलेल्या रिअॅक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 'शाहरुख खानची क्रेझ', असं कॅप्शन व्हायरल व्हिडीओला देण्यात आली आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स:
'तो जिथे जातो तिथे त्याला प्रेम आणि आदर मिळतो. खरोखर हा सुपरस्टार आहे. ' अशी कमेंट या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं केली आहे. तर दुसऱ्या युझरनं, ' चांगला व्यक्ती आणि चांगला अभिनेता आहे' अशी कमेंट एका युझरनं केली.
View this post on Instagram
शाहरुख खान हा अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याचा जवान हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर त्याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी आणि डंकी हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Shah Rukh Khan: 'चिकन 65 ची रेसिपी शिकायची आहे'; शाहरुखच्या ट्वीटनं वेधलं नेटकऱ्याचं लक्ष!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)