एक्स्प्लोर

मराठमोळी अभिनेत्री अभिलाषा पाटीलचं कोरोनामुळे निधन

कोरोनाची लागण झाल्यानंतर अभिलाषावर मुंबईतील एका रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरु होते. मात्र दिवसेंदिवस तब्येत आणखी बिघडली आणि अखेर अभिलाषाचं निधन झालं.

मुंबई : कोरोनामुळे सिनेसृष्टीला आज आणखी एक धक्का बसला आहे. अनेक हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केलेली अभिनेत्री अभिलाषा पाटील हिचं कोरोनामुळे मुंबईत निधन झाले आहे. अभिलाषा 47 वर्षांची होती. प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अभिलाषा पाटीलने 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'छिछोरे', 'गुड न्यूज', 'मलाल' अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या होत्या.

एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील बनारस शहरात गेल्या काही दिवसांपासून अभिलाषा पाटील वेब शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. मात्र तिथे शूटिंगदरम्यान तब्येत अचानक बिघडली होती. तब्येत बिघडल्यामुळे ती मुंबईला निघून आली. मुंबईत आल्यानंतर तिने कोरोनाची टेस्ट केली होती, जी पॉझिटिव्ह आली होती.

कोरोनाची लागण झाल्यानंतर अभिलाषावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. तब्येत खालावल्यामुळे तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, मात्र दिवसेंदिवस तब्येत आणखी बिघडली आणि अखेर अभिलाषाचं निधन झालं.

Corona 3rd Wave: कोरोनाची तिसरी लाट देखील येणार, केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांचा इशारा

अभिलाषाने 'बायको देता का बायको', 'ते आठ दिवस', 'प्रवास', 'तुझं माझं अरेंज मॅरेज', 'पिप्सी' अशा अनेक मराठी चित्रपटांत तिने काम केलं होतं. 'बापमाणूस' ही त्यांच्या लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त अभिलाषाने डिज्नी हॉटस्टारच्या वेब शो 'क्रिमिनल जस्टिस' च्या दुसर्‍या सीजनमध्येही काम केलं होतं.

अभिलाषाच्या असं अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. अभिलाषाच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget