एक्स्प्लोर

Subramanian Swamy: पीएमओवर अवलंबून राहण्यात अर्थ नाही, कोरोनाविरोधी लढाईचं नेतृत्व गडकरींकडे द्या: खासदार सुब्रमण्यम स्वामी

इस्लामिक राज्यकर्ते आणि वसाहतवादी ब्रिटिशांच्या कचाट्यातून भारत सहिसलामत सुटला आहे, आताही कोरोनावर मात करेल असं खासदार सुब्रमण्यम स्वामी (MP Subramanian Swamy) म्हणाले. भारतात कोरोनाची आणखी एक लाट येऊ शकते जी लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे असाही त्यांनी इशारा दिला आहे. 

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून रुग्णालयांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि बेड्सच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशावेळी कोरोनाची लढाई लढताना पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी या लढाईची कमान आता नितीन गडकरींकडे सोपवावी अशी सूचना खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. 

खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून आतापर्यंत अनेक वेळा मोदी सरकारला सूचना केल्या आहेत. आताही त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाच प्रकारची एक सूचना केली आहे. ते म्हणतात की, "भारताने आतापर्यंत इस्लामिक राज्यकर्त्यांच्या आक्रमणापासून आणि साम्राज्यवादी ब्रिटिशांच्या कचाट्यातून आपली यशस्वी सुटका करुन घेतली आहे. त्याच पद्धतीने आताही कोरोनाच्या संकटावर मात केली जाईल. देशाला आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल आणि ती लाट लहान मुलांसाठी धोकादायक असणार आहे. त्यामुळे आतापासूनच आपण त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशावेळी पंतप्रधान कार्यालयावर अबलंबून राहण्याला काही अर्थ नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता या लढाईची कमान नितीन गडकरींवर सोपवावी."

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना कोरोना विरोधातील या लढाईत मोकळीक दिली नसल्याचं सांगितलं आहे. पण ते विनम्र असल्याने त्यांनी आतापर्यंत आपले कर्तव्य पार पाडले असून नितीन गडकरींच्या मदतीने ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतील असंही खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलं आहे.

खासदार सुब्रमण्यम स्वामींच्या या ट्वीट्सवर कमेंटचा पाऊस पडला असून त्यामध्ये सुब्रमण्यम स्वामींची सूचना बरोबर असल्याचा सूर अनेकांनी आवळला आहे.

यापूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी कोविड परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं ट्वीटवरुन अभिनंदन केलं होतं.

महत्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सUday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रियाDevendra Fadnavis  : आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
Radhakrishna Vikhe Patil : हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा
हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा
VC Janardan Rao : 500 कोटींच्या संपत्तीचा वाद, तुम्ही वाटणी बरोबर केली नाही म्हणत अमेरिकेत शिकलेल्या नातवाचे चाकूने 86 वर्षीय उद्योजक आजोबांवर तब्बल 70 वार
500 कोटींच्या संपत्तीचा वाद, तुम्ही वाटणी बरोबर केली नाही म्हणत अमेरिकेत शिकलेल्या नातवाचे चाकूने 86 वर्षीय उद्योजक आजोबांवर तब्बल 70 वार
कोल्हापूरसह राज्यात जिल्हा परिषदेत माजी सैनिकांसाठी आरक्षित जागांवर नियमबाह्य भरती; मेडल्स परत करत आंदोलन
कोल्हापूरसह राज्यात जिल्हा परिषदेत माजी सैनिकांसाठी आरक्षित जागांवर नियमबाह्य भरती; मेडल्स परत करत आंदोलन
Embed widget