KBC 13 | जेव्हा हेमा मालिनी शोलेमधील धर्मेंद्र यांचा डायलॉग अमिताभ यांच्यासमोर बोलतात
कौन बनेगा करोडपतीच्या 13 व्या सीजनमध्ये शोले (Sholay) चित्रपटाची टीमने सहभाग घेतला आहे. यावेळी हेमा मालिनी (Hema Malini) धर्मेंद्र यांचा डायलॉग बोलताना पहायला मिळाल्या आहेत.

शोले चित्रपट संवाद आणि अॅक्शनसाठी प्रसिद्ध आहे. या चित्रपटातील संवाद आजही अनेक कार्यक्रमात वापरले जातात. हिच मेजवानी तुम्हाला पुन्हा याच कलाकारांकडून मिळणार आहे. या शुक्रवारी, कौन बनेगा करोडपतीच्या 13 वा सीजन 'शोले'च्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सज्ज झाली आहे. शोलेची टीम शोचा होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासोबत पुन्हा एकदा दिसणार आहे. चित्रपटाची लीड अभिनेत्री हेमा मालिनी आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी 'शानदार शुक्रावर' या विशेष भागासाठी हॉट सीटवर असणार आहेत.
View this post on Instagram
या शोचा एक टिजर रिलीज करण्यात आला असून यात हेमा, रमेश आणि अमिताभ चित्रपटाची 46 वर्षे साजरी करताना दिसली आहेत. इतक्या वर्षांनंतरही या तिघांची केमिस्ट्री दिसून येत आहे. शोलेच्या निर्मितीबद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी आणि किस्से या कलाकारांनी सांगितलेत. यावेळी हेमा आणि रमेश पडद्यामागं प्रत्यक्षात काय घडलं? हे देखील उघड करणार आहेत.
View this post on Instagram
आगामी एपिसोडचा प्रवीव्ह म्हणून शेअर केलेल्या टीझरमध्ये हेमा मालिनी धर्मेंद्र यांचा लोकप्रिय संवाद "बसंती, इन कुत्तो के सामने मत नाचना" बोलताना दिसत आहे. बिग बी आणि ड्रीम गर्ल पुढे जय-वीरूचा सीन पुन्हा तयार करतात, यावेळी हेमा मालिनी आपल्या संवादाने प्रेक्षकांना मोहीत करताना पहायला मिळतेय. सूत्रांनुसार, या एपिसोडमध्ये हे दोन कलाकार त्यांच्या सत्ते पे सत्तेचे क्षणही पुन्हा अनुभवताना दिसतील. "दिलबर मेरे" या लोकप्रिय गाण्यावर आधारितही गोष्टी पहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
हेमा मालिनी आणि रमेश सिप्पी कौन बनेगा करोडपती खेळात जिंकलेली रक्कम मथुरेतील मुलांच्या शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांसाठी काम करणाऱ्या ‘हेमा मालिनी फाउंडेशन’ला देणार आहेत.
View this post on Instagram
गुरुवारी, अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त, कौन बनेगा करोडपती 13 च्या टीमने त्यांच्यासाठी एक सरप्राईज दिलं होतं. चाहत्यांनी बिग बींच्या लोकप्रिय पात्रांची वेशभूषा केली आणि काही आयकॉनिक देखावे साकारले. प्रेमाने भारावून गेलेल्या अमिताभ यांनी आपल्या प्रेक्षकांचे आणि टीमचे मनापासून दाखवलेल्या आदरासाठी आभार मानले.
























