(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO: सेल्फी काढायला आलेल्या फॅनवर भडकल्या 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी; म्हणाल्या "आम्ही इथे..."
Hema Malini: इव्हेंटमधील हेमा मालिनी यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये त्या एका चाहत्यावर भडकलेल्या दिसत आहेत.
Hema Malini: बॉलिवूडमधील ड्रीम गर्ल म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. हेमा मालिनी या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसापूर्वी त्या गुलजार यांची बायोग्राफी 'गुलजार साहब: हजार राहें मुड़कर देखें'च्या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. या इव्हेंटमधील हेमा मालिनी यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये त्या एका चाहत्यावर भडकलेल्या दिसत आहेत.
चाहत्यावर चिडल्या हेमा मालिनी
इव्हेंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये दिसत आहे की, सर्व पापाराझी हेमा मालिनी यांचे फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. अशताच त्यांचा एक फॅन त्यांच्याकडे सेल्फी काढण्याची मागणी करतो. त्या फॅनवर हेमा मालिनी चिडतात. त्या म्हणतात, "आम्ही इथे सेल्फी घेण्यासाठी आलो आहोत का?" हेमा मालिनी यांचा इव्हेंटमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
हेमा मालिनी यांच्या खास लूकनं वेधलं लक्ष
इव्हेंटसाठी हेमा मालिनी यांनी खास लूक केला होता. त्या लाल आणि सोनेरी रंगाची साडी,मोकळे केस आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये इव्हेंटमध्ये पोहोचल्या. त्यांच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. हेमा मालिनी यांच्याशिवाय चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज, ज्येष्ठ लेखक गुलजार, यतींद्र मिश्रा हे देखील या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. गुलजार साहब यांची बायोग्राफी लवकरच प्रदर्शित होणार आहे.
काही दिवसांपूर्वी हेमा मालिनी यांनी त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
शोले चित्रपटातील हेमा मालिनी यांनी साकारलेल्या बसंती या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यांनी ड्रीम गर्ल, मोहिनी, सपनों का सौदागर, शोले या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हेमा मालिनी यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: