Watch Video : "क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो"; हेमा मालिनींच्या बर्थ-डे पार्टीत रेखा यांनी केला डान्स, पाहा व्हिडीओ
नुकताच अभिनेत्री रेखा (Rekha) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये या दोघी "क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो" या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
![Watch Video : Hema Malini Birthday Party Rekha dance on song Kya Khoob Lagti Ho With Hema Malini On Her 75th Birthday Watch Video Watch Video :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/17/05739c41aa22aee742cfbce7fec170251697527962723259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hema Malini Birthday Party: बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांचा काल 75 वा वाढदिवस होता. हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. हेमा मालिनी यांच्या बर्थ-डे पार्टीमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकताच अभिनेत्री रेखा (Rekha) आणि हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये या दोघी "क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो" या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रेखा आणि हेमा मालिनी या स्टेजवर "क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो" या गाण्यावर डान्स करत आहेत. हेमा मालिनी यांनी बर्थ-डे पार्टीसाठी पिंक कलरची नेटची साडी आणि सिल्वर कलरच्या ज्वेलरी असा लूक केला होता. तर रेखा यांनी व्हाईट कलरची साडी, गोल्डन कलरची ज्वेलरी आणि हतात व्हाईट पर्स असा लूक केला होता.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
हेमा मालिनी आणि रेखा यांनी या चित्रपटांमध्ये केलं काम
हेमा मालिनी आणि रेखा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांनी रमेश बहल यांनी दिग्दर्शित केलेल्या 'अपने अपने' आणि रघुनाथ झालानी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'जान हाथेली पे' या दोन्ही चित्रपटात एकत्र काम केले. रेखा, अनुपम खेर, जया बच्चन, राणी मुखर्जी, जॅकी श्रॉफ, आयुष्मान खुराना, सलमान खान, विद्या बालन आणि रवीना टंडन या कलाकारांनी रेखा यांच्या बर्थ-डे पार्टीला हजेरी लावली होती. तसेच हेमा मालिनी यांच्या चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
हेमा मालिनी यांचे चित्रपट
शोले चित्रपटातील हेमा मालिनी यांनी साकारलेल्या बसंती या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यांनी ड्रीम गर्ल, मोहिनी, सपनों का सौदागर, शोले या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)