एक्स्प्लोर

हार्दिक-नताशा, ऋतिक रोशन-सुझेन की आमीर खान-टीना दत्ता, बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट कुणाचा?

Hardik Pandya Natasha Stankovic : क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा यांचा घटस्फोट झाला असून नताशाला किती पोटगी मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे.

Most expensive divorce Star Couple : क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच (Natasha Stankovic) यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांनीही एकमेकांपासून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. या दरम्यान हार्दिक पांड्या त्याच्या मालमत्तेपैकी 70 टक्के रक्कम परस्पर संमतीने नताशाला देणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, बॉलिवूडमधली ही आजवरची सर्वात मोठी पोटगी असून हा सर्वात महागडा घटस्फोट असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील काही महागड्या घटस्फोटांबद्दल जाणून घ्या.

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच यांचा घटस्फोट हा आतापर्यंतचा सर्वात महागडा घटस्फोट असल्याचं बोललं जात आहे. हार्दिकने नताशाला पोटगी म्हणून किती रक्कम दिली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक त्याच्या संपत्तीपैकी 70 टक्के रक्कम नताशाला देणार असल्याची चर्चा आहे. 

अभिनेत्री करिश्मा कपूरने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केलं. 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना समायरा आणि कियान ही दोन मुले आहेत. करिश्मा कपूरनेही पती संजय कपूरपासून वेगळे होण्यासाठी मोठी रक्कम मागितली होती. मीडिया रिपोर्टनुसार, करिश्माने  संजय कपूरकडून घटस्फोटासाठी आलिशान घरासह 14 कोटी रुपये पोटगी घेतल्याचं सांगितलं जातं. ज्या घरामध्ये आज करिश्मा तिच्या मुलांसोबत राहते, ते संजयकडून मिळालं होतं. यासोबतच दोन्ही मुलांच्या संगोपनासाठी तो करिश्मा कपूरला दर महिन्याला 10 लाख रुपये देतो.

सैफ अली खान आणि अमृता सिंग

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा घटस्फोटही चर्चेत होता. 1991 मध्ये त्यांचे लग्न झालं होतं. मात्र, 13 वर्षांनंतर 2004 मध्ये यांचा संसार मोडला. घटस्फोटानंतर सैफने अमृताला 5 कोटी रुपये पोटगी दिली होती. जी रक्कम त्या काळात खूप मोठी मानली जात होती.

अरबाज खान-मलायका अरोरा

अरबाज खान-मलायका अरोरा या दोघांच्या लग्नाची आणि घटस्फोटाची खूप चर्चा झाली. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका अरोराने पोटगी म्हणून 15 कोटी रक्कम घेतली होती.

फरहान अख्तर-अधुना भबानी

फरहान अख्तरलाही त्याची पत्नी अधुना भबानीपासून घटस्फोट घेणं चांगलंच महागात पडलं.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधुनाने मुंबईत एक मोठा फ्लॅट आणि फरहानच्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीत हिस्सा मागितला होता. यासोबतच फरहानने अधुनाला सुमारे 15 कोटी रुपयांची पोटगीही दिली होती.

आमिर खान आणि रीना दत्ता

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आणि रीना दत्ता यांचा घटस्फोटही चाहत्यांसाठी धक्का देणारा होता. 1986 मध्ये आमिर खान आणि रीनाने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन कोर्ट मॅरेज केलं. 2002 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खानने रीना दत्ताला पोटगी म्हणून 50 कोटी रुपये दिल्याचं सांगितलं जातं.

हृतिक रोशन आणि सुझेन खान

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविचप्रमाणेच बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुझेन खान यांचा घटस्फोटही चर्चेत राहिला. जेव्हा या जोडप्याने घटस्फोटाची घोषणा केली तेव्हा चाहत्यांना धक्काच बसला. हृतिक-सुझानने 2004 मध्ये लग्न केलं होतं. 14 वर्षे एकत्र संसार केल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुझेन खानने वेगळं होण्यासाठी हृतिक रोशनकडून सुमारे 400 कोटी रुपये पोटगी म्हणून घेतल्याचं बोललं जातं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : 'ऐश्वर्याला माझ्या परवानगीची गरज नाही', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चनचं जुनं ट्वीट व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Haiwaan Box Office Collection: 100 कोटींहून अधिक बजेट, 10% ही वसूल झाले नाहीत, 'हनुमान अंश' अन् 'मिर्झापूर'च्या दहशतीसमोर 'हैवान' सपशेल आपटला; किती कमावले?
100 कोटींहून अधिक बजेट, 10% ही वसूल झाले नाहीत, 'हनुमान अंश' अन् 'मिर्झापूर'च्या दहशतीसमोर 'हैवान' सपशेल आपटला; किती कमावले?
Sara Tendulkar on Ganeshotsav: दिसतेस जणू अप्सराच! सारा तेंडुलकरचा खास गणेशोत्सव लूक व्हायरल; साडी, दागिने अन् केसात गजरा, वहिनीसोबत दिली खास पोज
दिसतेस जणू अप्सराच! सारा तेंडुलकरचा खास गणेशोत्सव लूक व्हायरल; साडी, दागिने अन् केसात गजरा, वहिनीसोबत दिली खास पोज
Ahana Krishna Married: विशीत झाली भेट, तिशीत लग्न; 10 वर्षांची प्रेमकहाणी अखेर विवाहबंधनात, प्रसिद्ध अभिनेत्रीने कुणाशी केलं लग्न?
विशीत झाली भेट, तिशीत लग्न; 10 वर्षांची प्रेमकहाणी अखेर विवाहबंधनात, प्रसिद्ध अभिनेत्रीने कुणाशी केलं लग्न?
Salman Khan Cryptic Post On Happiness: 'आज माझ्याकडे सगळंय, तरी मी दुःखी का?'; सलमान खानच्या 'त्या' पोस्टनं हादरले चाहते, पोटतिडकीनं विचारू लागले, 'भाईजान काय झालं?'
'आज माझ्याकडे सगळंय, तरी मी दुःखी का?'; सलमान खानच्या 'त्या' पोस्टनं हादरले चाहते, पोटतिडकीनं विचारू लागले, 'भाईजान काय झालं?'

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
Bihar Flood: बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
Rohini Khadase On UPI Charge: ''डिजिटल इंडिया' म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली अन् आता...', सरकारच्या UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या संतापल्या
'डिजिटल इंडिया' म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली अन् आता...', सरकारच्या UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या संतापल्या
Is MDR On Credit Cards Linked To UPI: UPI शी जोडलेल्या क्रेडिट कार्ड्सनासुद्धा MDR लागू होणार? काय सांगतो नवा नियम?
UPI शी जोडलेल्या क्रेडिट कार्ड्सनासुद्धा MDR लागू होणार? काय सांगतो नवा नियम?
Shilpa Shetty Ganesh Visarjan: शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
Nagpur Crime: खिशातून बळजबरीने 8 हजार अन् मोबाईल हिसकावले, नियमबाह्य पद्धतीने पाच तरुणांना बेदम मारहाण; नागपुरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप
खिशातून बळजबरीने 8 हजार अन् मोबाईल हिसकावले, नियमबाह्य पद्धतीने पाच तरुणांना बेदम मारहाण; नागपुरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप
Manoj Jarange Patil in Beed: मुंगी शिरायलाही जागा उरली नाही, बीडमध्ये रात्री 2 वाजताही मनोज जरांगेंच्या सभेसाठी चौक खचाखच भरला, मराठा बांधवांची गर्दी
मुंगी शिरायलाही जागा उरली नाही, बीडमध्ये रात्री 2 वाजताही मनोज जरांगेंनी चौक खचाखच भरुन टाकला, मराठा बांधवांची गर्दी
Embed widget