एक्स्प्लोर

Happy Birthday Sara Ali Khan : अभिनेत्री व्हायचं बालपणीचं ठरवलेलं, स्टारकिड असूनही स्वतःच्या बळावर मिळवले चित्रपट! वाचा सारा अली खानबद्दल..

Sara Ali Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आज (12 ऑगस्ट) तिचा 27वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sara Ali Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आज (12 ऑगस्ट) तिचा 27वा वाढदिवस साजरा करत आहे. सारा अली खानचा जन्म 12 ऑगस्ट 1995 रोजी बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्यात झाला. साराचे वडील सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि आई अमृता सिंह (Amruta Singh) दोघेही प्रसिद्ध कलाकार आहेत. केवळ आई-वडीलच नव्हे तर, आजी देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री असल्याने सारावर लहानपणापासूनच अभिनयविश्वाचा प्रभाव होता. आपणही अभिनेत्रीच व्हायचं, हे साराने बालपणीच ठरवले होते. आपलं बालपणीचं स्वप्न पूर्ण करणारी सारा आजघडीला एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे.

सारा अली खानने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सैफची लाडकी लेक सारा अली खानने 2018मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत झळकला होता. साराने तिच्या पहिल्याच चित्रपटातून चाहत्यांची मने जिंकली. आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सारा अली खान हिचे नाव अग्रक्रमी आहे.

लठ्ठपणामुळे नेहमी व्हायची ट्रोल

मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यापूर्वी सारा अली खान हीच वजन तब्बल 96 किलो इतकं होतं. वाढत्या वजनामुळे आणि लठ्ठपणामुळे सारा नेहमी ट्रोल व्हायची. मात्र, अभिनेत्री होण्यासाठी साराने विशेष मेहनत घेतली. लठ्ठपणा हा त्याच्या स्वप्नांमधला सर्वात मोठा अडथळा होता. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना तिने व्यायाम करत आपले वजन कमी केले होते. लठ्ठपणावर मात करत तिने स्वतःला या झगमगाटी विश्वात स्थापित केले. 

सोशल मीडियावरही साराची हवा!

अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. कधी सारा अली खान तिच्या क्युट अंदाजामुळे, तर कधी बिकिनी परिधान करता बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. साराचे फोटोही खूप व्हायरल होत असतात. सारा अली खान अनेकदा 'नॉक नॉक' आणि 'नमस्ते प्रेक्षक' हे व्हिडीओ देखील शेअर करते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. सारा अली खानचे इंस्टाग्रामवर 40.9 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि तिने आतापर्यंत 841 पोस्ट केल्या आहेत.

साराची कारकीर्द

सारा अली खानने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर सारा रणवीर सिंहसोबत ‘सिम्बा’ या चित्रपटात दिसली. या चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी याने स्वतः म्हटले होते की, स्टारकिड असूनही साराने कोणतीही ओळख न वापरता स्वतःच्या मेहनतीने या चित्रपटातील भूमिका मिळवली होती. त्याच वेळी, सारा कार्तिक आर्यनसोबत ‘लव आज कल’ या चित्रपटात झळकली होती. यासोबतच सारा वरुण धवनसोबत ‘कुली नंबर’ या चित्रपटात दिसली होती. सारा अली खान शेवट ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसली होती. अभिनेत्री लवकरच विकी कौशलसोबत एका चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे नाव अद्याप ठरलेले नाही. त्याचबरोबर, ती विक्रांत मेस्सीसोबतही आगामी चित्रपटात चमकणार आहे.

हेही वाचा :

Sara Ali Khan : शिमरी आऊटफिटमध्ये साराचा 'किलर लूक', पाहा फोटो

Koffee With Karan 7: रश्मिका मंदना आणि विजय देवरकोंडाच्या नात्याबाबत सारा अली खानचा गौप्यस्फोट; म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
South Star Ravi Prakash: मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget