Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूडच्या ‘डॉन’चा 80वा वाढदिवस! पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते करण जोहरपर्यंत दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) आज वयाची 80 वर्ष पूर्ण करत आहेत. या खास निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
![Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूडच्या ‘डॉन’चा 80वा वाढदिवस! पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते करण जोहरपर्यंत दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव! Happy Birthday Amitabh Bachchan: celebrities wishes and post shared on social media know all details Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूडच्या ‘डॉन’चा 80वा वाढदिवस! पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते करण जोहरपर्यंत दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/a982fdd752e1325a5598758b5c8f70d61665464360250373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) आज वयाची 80 वर्ष पूर्ण करत आहेत. या खास निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहतेच नव्हे तर, मनोरंजन विश्वातील कलाकार आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी देखील अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. देशभरातच नव्हे तर, जगभरात त्यांचे करोडो चाहते आहेत. चाहत्यांच्या मनावर त्यांनी आपली अमिट छाप सोडली आहे. वयाच्या 80व्या वर्षीही बिग बी इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. त्यांचा उत्साह आजच्या तरुणाईपेक्षा कमी नाही. बिग बींच्या व्यक्तिमत्त्वात असंख्य रंग आहेत. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आजच्या या दिवशी जगाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा!
देशातील सर्वात उल्लेखनीय चित्रपट व्यक्तिमत्त्वांपैकी एक असे म्हणत पंतप्रधानांनी अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विट करत लिहिले की, ‘अमिताभ बच्चनजी यांना 80व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ते भारतातील सर्वात उल्लेखनीय चित्रपट व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत, ज्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध केले आणि त्यांचे मनोरंजन केले. त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो.’
भारतीयाच्या हृदयात एक विशेष स्थान : प्रल्हाद जोशी
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा दिल्या आणि लिहिले की, ‘पद्मविभूषण श्री अमिताभ बच्चनजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी साकारलेली प्रसिद्ध पात्रे आणि त्यांनी सादर केलेले अप्रतिम कार्यक्रम यांना प्रत्येक भारतीयाच्या हृदयात एक विशेष स्थान आहे.’
आम्ही तुमच्याकडून प्रेरणा घेतो : अजय देवगण
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यानेही एक छोटी क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आणि लिहिले, ‘80व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अमिताभ बच्चन सर! तुम्हाला पुढील आयुष्यासाठी उदंड शुभेच्छा. तुम्ही आमच्या सर्वांपेक्षा खूप पुढे आहात आणि आम्ही तुमच्याकडून प्रेरणा घेत आहोत.’ अजय देवगण आणि अमिताभ बच्चन ‘रनवे 34’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.
चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी देखील अमिताभ बच्चन यांना 80व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा अमिताभ बच्चन.. अशा खास दिवशी तुमच्या आयुष्यातील खास आठवणींना उजाळा दिला जातो तेव्हा तुमचा चित्रपटसृष्टीवर किती प्रभाव आहे ते लक्षात येते.’
‘आदरणीय अमित जी! तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य देवो. तुम्ही फक्त एक अभिनेता म्हणून नाही, तर माणूस म्हणून माझ्यासाठी प्रेरणा आहात! ‘आखरी रास्ता’ ते ‘उंचाई’पर्यंत तुमच्यासोबत काम करताना जीवनाच्या विविध पैलूंबद्दल खूप काही शिकण्यासारखं आहे’, असं म्हणत अभिनेते अनुपम खेर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनयाचे मास्टरक्लास : कारण जोहर
अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना निर्माता-दिग्दर्शक कारण जोहर याने एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने अमिताभ बच्चन यांना अभिनयाचे मास्टरक्लास म्हटले आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)