Hanuman Teaser: 'यांच्याकडून शिका!'; 'हनुमान'चा टीझर रिलीज होताच नेटकऱ्यांनी साधला 'आदिपुरुष' वर निशाणा
हनुमान (Hanuman) चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर काही नेटकरी आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरवर निशाणा साधत आहेत.
Hanuman Teaser: गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या VFX ला तसेच कलाकारांच्या लूकला ट्रोल केलं. आता नुकताच हनुमान या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात देखील VFX चा वापर करण्यात आला. पण हनुमान (Hanuman) चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर काही नेटकरी आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरवर निशाणा साधत आहेत.
हनुमान या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा देखील प्रशांत यांनी लिहिली आहे. हनुमान या चित्रपटात तेजा सज्जा, अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटाची निर्मिती निरंजन रेड्डी यांनी केली आहे. या चित्रपटाचा टीझर पाहून आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट बघत आहेत.
पाहा टीझर
नेटकऱ्यांनी साधला आदिपुरुषवर निशाणा
अनेक नेटकऱ्यांनी हनुमान चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर आदिपुरुष या चित्रपटाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'हनुमान चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर अंगावर शहारे आले. या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहे. यांच्याकडून आदिपुरुषच्या टीमनं शिकलं पाहिजे.'
The teaser gives goosebumps. Although there are some inconsistent VFX effects, they can be overlooked since they were used correctly. Excited for movie! #HanuManTeaser#Adipurush should learn from this 😁
— Samyak Nayak (@samyak_nayak_) November 21, 2022
बिग बजेट आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरपेक्षा हा चित्रपट चांगला वाटत आहे.
#HanuManTeaser 👌
— Vinay (@vinay_a9) November 21, 2022
Frankly speaking much better than high budgeted animation mve #Adipurush teaser.https://t.co/bco2uFONUb
Brilliant!! Now #Adipurush is in much more trouble!! #HanuManTeaser
— Sunny Kesh (@Sunnykesh) November 21, 2022
@PrasanthVarma @tejasajja123 @Primeshowtweets This Teaser VFX is completely 100 times better than #Adipurush 💥👌
— Pavan Vipparthi (@pavanvipparthi9) November 21, 2022
12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये 'आदिपुरुष' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये 'आदिपुरुष' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आदिपुरुष हा पौराणिक शैलीतील चित्रपट आहे हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: