Golden Globe Awards 2023 : गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला सुरुवात; नॉमिनेशन लिस्ट, होस्ट अन् कुठे होणार स्ट्रीम? जाणून घ्या...
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला (Golden Globe Awards 2023) आरआरआर (RRR) चित्रपटाच्या टीमनं हजेरी लावली आहे.
Golden Globe Awards 2023: गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला (Golden Globe Awards 2023) सुरुवात झाली आहे. हा पुरस्कार सोहळा भारतात 6:30 वाजल्यापासून स्ट्रीम केला जात आहे. या पुरस्कार सोहळ्याला आरआरआर (RRR) चित्रपटाच्या टीमनं हजेरी लावली आहे.
कुठे होणार स्ट्रीम?
यंदा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याचे लाइव्ह-स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. त्याचा लाइव्ह प्रीमियर अमेरिकेत 10 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता होणार आहे. तर भारतात या पुरस्कार सोहळ्याचे प्रीमियर 11 जानेवारी रोजी सकाळी 6:30 वाजता होणार आहे. भारतातील प्रेक्षक Lionsgate Play वर हा पुरस्कार सोहळा पाहु शकतात.
होस्ट
जेरॉड कारमाइकल हे प्रथमच गोल्डन ग्लोब पुरस्काराचे होस्टिंग करणार आहेत. नेबर्समध्ये या 2014 च्या कॉमेडी चित्रपटामुळे जेरॉड कारमाइकलला प्रसिद्धी मिळाली.
आरआरआरची टीम गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर
The staRRRs have arrived!! #GoldenGlobes #GoldenGlobes2023 pic.twitter.com/l8MN8GUBjC
— RRR Movie (@RRRMovie) January 11, 2023
नामांकन यादी
'आरआरआर' या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामध्ये दोन नामांकने मिळाली आहेत. एसएस राजामौली यांच्या चित्रपटाला 'नाटू-नाटू' गाण्याला या सुपरहिट गाण्यासाठी मोशन पिक्चरमधील बेस्ट ओरिजिनल सॉन्ग आणि बेस्ट पिक्चर (नॉन-इंग्लिश) नामांकन मिळाले आहे.
Golden Globe Awards 2023: कौतुकास्पद! सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीमधील गोल्डन ग्लोब पुरस्कार आरआरआरमधील 'नाटू नाटू' नं पटकावला
And the GOLDEN GLOBE AWARD FOR BEST ORIGINAL SONG Goes to #NaatuNaatu #GoldenGlobes #GoldenGlobes2023 #RRRMovie
— RRR Movie (@RRRMovie) January 11, 2023
pic.twitter.com/CGnzbRfEPk
बेस्ट ड्रामा सीरीज
1.बेटर कॉल शाऊल
2.द क्राउन
3.हाउस ऑफ द ड्रैगन
4.ओजार्क
5. सेवरेंस (Severance)
बेस्ट अॅक्ट्रेस टीव्ही ड्रामा सीरिज
1.एम्मा डी आर्सी- हाउस ऑफ द ड्रैगन
2.जेंडया- यूफोरिया (Euphoria)
3.हिलेरी स्वँक- अलास्का डेली
4.इमेल्डा स्टॉन्टन- द क्राउन
5. लॉरा लिनी- ओजार्क
बेस्ट अॅक्टर टीव्ही ड्रामा सीरिज
1.जेफ ब्रिज- द ओल्ड मॅन केविन
2.एडम स्कॉट- सेवरेंस (Severance)
3.बॉब ओडेंकिर्क- बेटर कॉल शाऊल
4.कोस्टनर- येलोस्टोन
5.डिएगो लूना- अँडोर
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: