एक्स्प्लोर

Godavari Movie: 'नदीसाठी, नदीकाठी!'; गोदावरी चित्रपटाच्या टीमनं केली ‘गोदावरी’ नदीची आरती

'गोदावरी' (Godavari) चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत कुसुमाग्रज स्मारक येथे दीपप्रज्वलन करण्यात आले. तर ‘गोदावरी’च्या टीमने पंचवटी येथे ‘गोदावरी’ नदीची आरतीही केली. 

Godavari Movie: राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' (Godavari) चित्रपट आता आपल्या मायदेशी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. आता चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नाशिकमध्ये पुन्हा एकदा हजेरी लावत चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी संपूर्ण टीमच्या उपस्थितीत कुसुमाग्रज स्मारक येथे दीपप्रज्वलन करण्यात आले. तर ‘गोदावरी’च्या टीमने पंचवटी येथे ‘गोदावरी’ नदीची आरतीही केली. 

या वेळी जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, संजय मोने, लेखक प्राजक्त देशमुख, दिग्दर्शक निखिल महाजन, जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंट हेड निखिल साने आदी मान्यवर उपस्थित होते. 

नाशिकमध्ये राहणाऱ्या निशिकांतच्या हसत्याखेळत्या कुटुंबातील चढउतार तसेच परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आले आहे. 'गोदावरी' नदी ही या चित्रपटाची मुख्य दुवा आहे. गोदावरी नदी जिने सुख आणि दुःख दोन्ही अनुभवले आहे, तिचे आणि निशिकांतचे एक अनोखे नाते यात पाहायला मिळणार आहे. ‘गोदावरी’ नदीविषयी मनात कटुता असणाऱ्या निशिकांत आणि गोदावरीमध्ये नक्की काय संबंध आहे, हे कोडं चित्रपट पाहिल्यावरच उलगडेल. या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘कोजागिरी’ आणि ‘खळ खळ गोदा’ ही श्रवणीय गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. उत्सुकता वाढवणारा ट्रेलर, जबरदस्त संगीत, दर्जेदार कथानक, दिग्दर्शक आणि कलाकार अशा सगळ्याच जमेच्या बाजू असणाऱ्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. 

चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, ''राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर आता 'गोदावरी' आपल्या घरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. हा एक भावनिक आणि कौटुंबिक चित्रपट आहे, जो मनाच्या खोलवर जाणारा आहे. अनेकदा असं होत की, एखादी गोष्ट साध्य करण्याच्या नादात आपण अनेक जवळच्या गोष्टी, नाती मागे सोडतो आणि त्याच मौल्यवान नात्यांची किंमत जाणवून देणारा हा चित्रपट आहे. नात्यांचे महत्व अधोरेखित करणारा 'गोदावरी' संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याने आमचे कुटुंब पुन्हा एकदा खळाळत्या नदीसाठी, नदीकाठी भेटलो आहोत.”

‘गोदावरी’बद्दल जितेंद्र जोशी म्हणतात, ‘’गोदावरीच्या निमित्ताने मी एक नवी सुरूवात करतो आहे. कारण 'गोदावरी' हे निर्मिती क्षेत्रातील माझं पहिलं पाऊल असणार आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा नाशिकला येऊन ‘गोदावरी’नदीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने आमचे ‘गोदावरी’चे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले.  इथल्या गल्लीतून फिरताना पुन्हा चित्रीकरणाच्या त्या भावनिक आठवणी ताज्या झाल्या. नाशिकसोबत आता एक घट्ट नातं निर्माण झालं आहे. विशेषतः गोदावरीसोबत. प्रत्येक कुटुंबाला जोडणारा हा चित्रपट असून आयुष्यात कुटुंब, नाती किती महत्वाची असतात, याची नव्याने ओळख करून देणारी ही गोष्ट आहे.” याबाबत जितेंद्र जोशीनं सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये 'नादीसाठी, नदीकाठी!' असं लिहिलेलं दिसत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुमच्या आमच्या कुटुंबाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबरला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारने India @ 75 या निमित्ताने भारतीय भाषांमधील ६ चित्रपटांची निवड ‘कान्स’ या जागतिक महोत्सवासाठी केली होती, त्यात ‘गोदावरी’ या एकमेव मराठी चित्रपट समावेश होता. 

त्याचबरोबर इफ्फी महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय - इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात 'गोदावरी'ने आपली मोहोर उमटवली आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Khal Khal Goda Song: "खळ खळ गोदा"; गोदावरी चित्रपटातील गाणं प्रदर्शित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रियाRohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेटHingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवातTop News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget