![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ghoomer motion poster: अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या 'घुमर' चं पोस्टर आलं प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज
अभिषेकने त्याच्या घूमर (Ghoomer) या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
![Ghoomer motion poster: अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या 'घुमर' चं पोस्टर आलं प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज ghoomer motion poster Out abhishek bachchan saiyami kher film Ghoomer motion poster: अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या 'घुमर' चं पोस्टर आलं प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/31/e1545e2e07425b0e16b185387bea484c1690792743749259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ghoomer motion poster: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकतेच अभिषेकने त्याच्या घूमर (Ghoomer) या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) देखील दिसत आहे. अभिषेकनं शेअर केलेल्या घूमर या चित्रपटाच्या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
घूमर या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सैयामीचा फक्त डावा हात दिसत आहे. तिला उजवा हात नाहीये, असं दिसत आहे. सैयामीने डाव्या हातात, क्रिकेट बॉल धरलेला दिसत आहे. ती व्हाईट टी-शर्ट आणि पँट अशा लूकमध्ये दिसत आहे. तर अभिषेक बच्चन हा या पोस्टरमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. ब्लॅक हुडी आणि ब्लँक पँट अशा लूकमध्ये तो दिसत आहे. अभिषेकनं या पोस्टरला कॅप्शन दिलं, 'लाईफ लॉजिक का खेल नहीं...मॅजिक का खेल है'
View this post on Instagram
तसेच अभिषेकनं घूमर या चित्रपटाचं मोशन पोस्टर देखील शेअर केलं आहे. 'एक हाथ से देश के लिए खेल सकता है। नो, ये लाइफ ना लॉजिक का नहीं, बल्कि मैजिक का खेल है।' हा डायलॉग घूमर या चित्रपटाच्या मोशन पोस्टरच्या सुरुवातीला ऐकू येतो. घूमर चित्रपटाच्या या मोशन पोस्टरला कमेंट करुन अनेकांनी अभिषेकला त्याच्या या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
घूमर हा चित्रपट आर. काल्की यांनी दिग्दर्शित केलेला आहे. ज्यामध्ये एका हातानं बॉलिंग करणाऱ्या खेळाडूची कथा दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अभिषेक बच्चनच्या लुडो, बॉब बिस्वास, मनमर्जिया, हॅप्पी न्यू इअर, दोस्ताना आणि दिल्ली-6 या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्याच्या घूमर या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)