Pankaj Udhas : ज्येष्ठ गायक पंकज उधास अनंतात विलीन; अखेरचा निरोप देताना कुटुंबियांना अश्रू अनावर
Pankaj Udhas : ज्येष्ठ गायक पंकज उधास अनंतात विलीन झाले आहेत. वरळी हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
Pankaj Udhas : आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ गायक पंकज उधास (Pankaj Udhas) अनंतात विलीन झाले आहेत. वरळी हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंत्यसंस्काराआधी मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली आहे. पंकज उधास यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.
पंकज उधास यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मनोरंजनसृष्टीतील मंडळींसह अनेक चाहते उपस्थित होते. अंत्यसंस्कार करण्याआधी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पंकज उधास यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
गझल गायकीच्या क्षेत्रात आपलं विशेष स्थान निर्माण करणारे पंकज उधास
पंकज उधास यांनी गझल गायकीच्या क्षेत्रात आपलं एक स्थान निर्माण केलं होतं. 1980 मध्ये 'आहत' नामक अल्बमच्या माध्यमातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पंकज उधास यांची मुकरार, तरन्नम, मेहफिल, चिट्टी आयी है, और आहिस्ता कीजिए बातें, ना कजरे की धार, चांदी जैसा रंग है तेरा, मत कर इतना गुरुर, आज फिर तुम पर प्यार आया है, अशी अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत.
पंकज उधास यांच्याबद्दल जाणून घ्या (Who is Pankaj Udhas)
पंकज उधास यांचा जन्म गुजरातमधील जेतूपूरमध्ये झाला. त्यांचा पहिला अल्बम 1980 मध्ये प्रसिद्ध झाला होता. पहिलाच अल्बम चांगलाच गाजला. पुढे 2011 पर्यंत त्यांचे 50 पेक्षा अधिक अल्बम रिलीज झाले. 1986 मध्ये आलेल्या उधास या सिनेमात काम करण्याची पुढे त्यांना संधी मिळाली.
'चिट्टी आयी है' गाण्याने बदललं आयुष्य
'नाम' हा सिनेमा 1986 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील 'चिट्टी आई है' हे गाणं चांगलच गाजलं. या गाण्याने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. या गाण्याला आनंद बक्षी यांनी संगीत दिलं होतं. रसिकांना या गाण्याने वेड लावलं. आजही हे गाणं आवडीने ऐकलं जातं. या गाण्याने पंकज उधास यांचं आयुष्य बदललं.
लेकीनेच दिलेली वडिलांच्या निधनाची बातमी
पंकज उधास यांच्या निधनानंतर त्यांच्या लेकीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना त्यांच्या निधनाची बातमी दिली होती. तिने लिहिलं होतं,"पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने 26 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी शेअर करताना आम्हाला खूप दु:ख होत आहे".
View this post on Instagram
संबंधित बातम्या