Gautami Patil : विराट कोहली की धोनी? गौतमी पाटील म्हणाली, धोनी; पण मुंबई इंडियन्स की सीएसके विचारल्यावर मात्र...
गौतमीच्या (Gautami Patil) एका मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मुलाखतीमध्ये गौतमीला विविध विषयांबाबत प्रश्न विचारण्यात आले.

Gautami Patil: गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आपल्या लावणी आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. गौतमीच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. That Odd Engineer या युट्यूब चॅनलनं गौतमी पाटीलची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये गौतमीला विविध विषयांबाबत प्रश्न विचारण्यात आले.
That Odd Engineer या युट्यूब चॅनलच्या मुलाखतीत गौतमीला तिच्या आवडत्या आयपीएल टीमबाबत प्रश्न विचारण्यात आला तसेच आवडत्या खाद्यपदार्थाबाबत देखील तिला विचारण्यात आलं. गौतमीला पुरणपोळी की तांबडा पांढरा? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला गौतमीनं पुरणपोळी असं उत्तर दिलं. विराट कोहली की धोनी? असा ही प्रश्न या मुलाखतीत गौतमीला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर गौतमीनं धोनी हे दिलं.
मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपरकिंग्स यापैकी आयपीएलमधील आवडता संघ कोणता? असाही प्रश्न गौतमीला मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर गौतमीनं मुंबई इंडियन्स असं दिलं. गौतमीच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. That Odd Engineer च्या या रॅपीड फायर राउंडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
व्हायरल व्हिडीओबाबत काय म्हणाली गौतमी?
गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कपडे बदलतानाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होत आहे. याबाबत या मुलाखतीमध्ये ती म्हणाली,'तू निर्लज्जासारखा व्हिडीओ काढशील याचा तुझ्या घरातील व्यक्तींना त्रास होणार नाही. ज्या मुलाचा व्हिडीओ तू काढतोय, तिला त्रास होणार आहे. हे कर्म आहे. त्यांनी इथेच फेडावं लागेल.'
गौतमीचं 'तेरा पता' हे गाणं नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तिच्या या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी गौतमी सज्ज आहे. गौतमीचा 'घुंगरू' (Ghungroo) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमातील 'मी करते तुम्हाला मुजरा' ही तिची लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Gautami Patil : गौतमी पाटील आता नव्या रुपात येणार; शिंदेशाहीच्या तालावर थिरकणार नृत्यांगणा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
