Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील प्रथमच रुपेरी पडद्यावर! 'घुंगरु'चं पहिलं पोस्टर आऊट
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या आगामी 'घुंगरु' (Ghungroo) या सिनेमाचं पहिलं पोस्टर आऊट झालं आहे.
Gautami Patil : महाराष्ट्राला आपल्या नृत्याने वेड लावणारी सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीच्या आगामी 'घुंगरु' (Ghungroo) या सिनेमाचं पहिलं पोस्टर आता आऊट झालं आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार गौतमी पाटीलचा 'घुंगरु'! (Ghungroo Release Date)
गौतमी पाटीलचा 'घुंगरु' हा सिनेमा येत्या 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेप्रेमींमध्ये या सिनेमाची चांगलीच उत्सुकता आहे. आज या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज होणार आहे. पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढणार आहे. पोस्टर आणि ट्रेलर लॉन्च दरम्यान गौतमी उपस्थित राहणार नाही. निर्माते बाबा गायकवाड (Baba Gaikwad) यांचे हस्ते या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात येईल.
नृत्यांगना आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील तिच्या नृत्यामुळे चर्चेत न येता आगामी सिनेमामुळे चर्चेत आली आहे. गौतमीच्या पहिल्यावहिल्या 'घुंगरु' या सिनेमाची सध्या सर्वत्र खूप चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आऊट झाला होता. 'घुंगरु' या सिनेमात गौतमी एका लावणी कलावंताची भूमिका साकारत आहे.
गौतमीच्या 'घुंगरु'बद्दल जाणून घ्या... (Gautami Patil Ghungroo Movie Details)
गौतमीने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला घायाळ केलं आहे. आता बॉक्स ऑफिस गाजवायला ती सज्ज आहे. गौतमीचा 'घुंगरु' हा सिनेमा लोककलावंतांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे. त्यामुळे गौतमीसाठी नक्कीच हा सिनेमा खूप खास असेल. या सिनेमात लव्हस्टोरी, लोककलावंतांचं आयुष्य त्यांचा संघर्ष, रहस्य अशा सर्वच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. बाबा गायकवाड (Baba Gaikwad) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. महत्त्वाचं म्हणजे बाबा गायकवाड यांनीच या सिनेमाची कथा, पटकथा लिहिली आहे. तसेच तेच या सिनेमाचे निर्माते आहेत.
'लावणी क्वीन' गौतमीचा हा पहिला सिनेमा असल्याने या सिनेमासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. 'घुंगरु' या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सोलापूर, माढा आणि हंपीसह परदेशात या सिनेमाचं शूटिंग झालं आहे.
गौतमीचा 'घुंगरु' बॉक्स ऑफिस गाजवणार?
गौतमीचा 'घुंगरु' हा पहिलावहिला मराठी सिनेमा 15 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात गोंधळ, राडा होत असतो. त्यामुळे तिचा सिनेमा पाहायला आलेले प्रेक्षक सिनेमागृहातही गोंधळ आणि राडा घालणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संबंधित बातम्या