Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील 'Jab Saiyaan' गाणे रिलीज, बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर
Jab Saiyaan : 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील जब सैंया' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
![Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील 'Jab Saiyaan' गाणे रिलीज, बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर Gangubai Kathiawadi song Jab Saiyaan Alia Bhatt plays the love game with her eyes in this romantic ballad Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील 'Jab Saiyaan' गाणे रिलीज, बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/15/5274d2920308c49d4e22db5f5f0dc7a5_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) सिनेमातील 'जब सैंया' (Jab Saiyaan) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे गायिका श्रेया घोषालने गायले आहे. गंगूबाईंच्या आयुष्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न या गाण्यात करण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
'जब सैंया' हे गाणे आलियाच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. 'जब सैंया' या गाण्याआधी सिनेमाचा ट्रेलर आणि सिनेमातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. 'ढोलिडा' (Dholida) असे या गाण्याचे नाव असून, हे गाणे आलिया भट्टवर चित्रित करण्यात आले आहे.
View this post on Instagram
काय आहे 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाची कथा?
आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा बायोग्राफिकल ड्रामा आहे. आलिया भट्ट या चित्रपटात 'गंगूबाई'ची भूमिका साकारत आहे. गंगूबाईला तिच्याच नवऱ्याने 500 रुपयांना विकले होते. या चित्रपटाची कथा लेखक हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. गंगूबाईंच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूला स्पर्श करण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे. एक सामान्य मुलगी कामाठीपुराची क्वीन कशी बनते, हे सर्व या सिनेमात पाहायला मिळेल.
बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर
'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर 72 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे. हा सिनेमा बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या बर्लिन स्पेशल सेगमेंटमध्ये दाखवला जाणार आहे.
संबंधित बातम्या
Anupam Kher : श्रीवल्ली गाण्यावर अनुपम खेर यांच्या आईने केला डान्स ; पाहा व्हिडीओ
Sonalee Kulkarni : '....पण प्रेमाला सीमेची बंधनं नसतात'; सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)